आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेट इज ओवर / रणवीर-दीपिका आज संध्याकाळी 6 वाजता शेअर करणारा लग्नाचा पहिला फोटो, 18 नोव्हेंबर रोजी इटलीहून परतणार मायदेशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. कोकणी पद्धतीनंतर सिंधी पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, हे नवदाम्पत्य 15 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो शेअर करणार आहेत.

 

गेस्टला दिले थँक्यू कार्ड आणि मिठाई

एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये एका कार्डसोबत मिठाई दिसत आहे. कार्डवर 15 नोव्हेंबर ही तारीख आहे. शिवाय त्यावर एक मेसेज लिहिला आहे, की तुमच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी आम्ही आभारी आहोत. दीपिका  आणि रणवीर... हे गिफ्ट्स पाहुण्यांना देण्यात आले आहे. 

 

फराह खानने दिले स्पेशल गिफ्ट

रणवीर आणि दीपिका जेव्हा फराह खानला लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा फराहने लाइफ कास्टिंग आर्टिस्ट भावना जसराकडून दोघांच्या हॅण्ड इम्प्रेशन असलेला एक मोमेंटो बनवून घेतला. फराह हे गिफ्ट दीपिका आणि रणवीरला त्यांच्या रिसेप्शनवेळी देणार आहे. या नवदाम्पत्यांनी रिसेप्शनमध्ये येणा-या पाहुण्यांना गिफ्टऐवजी चॅरिटी देण्याची भावनिक अपील केली आहे.

 

18 नोव्हेंबरला परतणार भारतात

लग्नानंतर हे कपल 18 नोव्हेंबर रोजी भारतात परतणार आहे. त्यानंतर जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरु येथे आणि 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

 

लग्नासारखाच रिसेप्शनस्थळीही असणार कडेकोट बंदोबस्त

- दीप-वीरच्या लग्नाचे फोटोज पाहुणे क्लिक करु शकणार नाहीत.  पाहुण्यांच्या मोबाइल आणि कॅमे-यावर स्टिकर चिकटवण्यात आले आहेत.
- लग्नाचे पहिले रिसेप्शन 21 नोव्हेंबर रोजी बंगळूरु आणि दुसरे रिसेप्शन 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे.
- रणवीर आणि दीपिकाचे रिसेप्शन कार्ड हाईटेक आहे. रिसेप्शन ठिकाणी ‘ई-इन्वाइट' घेऊन येणे सक्तीचे असल्याचे या कार्डवर नमुद करण्यात आले आहे. रिसेप्शनस्थळी प्रवेश घेताना पाहुण्यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या ई-इन्व्हाइटवरील QR कोड स्कॅन केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...