आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Poster Out: खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी... कंगना रनोटच्या 'मणिकर्णिका'चे पहिले पोस्टर रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडची क्वीन कंगना रनोटच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज म्हणजेच स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित करण्यात आले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात कंगनाने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे.


‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’च्या पोस्टरमध्ये मुलाला पाठीला बांधून रणांगणात इंग्रजांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या मर्दानी झाशीच्या राणीचे हे रुप तिने देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारे आहे. कंगनाचा या पोस्टरमधील लूक पाहून तिच्या या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. या भूमिकेसाठी कंगनाने खास तलवारबाजीचे धडेही गिरवले आहेत. तसेच ती या चित्रपटात अनेक स्टंट करताना दिसणार आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्याबरोबर अतुल कुलकर्णी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. झी स्टुडिओची प्रमुख निर्मिती असलेला हा चित्रपट 25 जानेवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...