• Home
  • First robotic parking in China; Car parking to be done in just one minute at Beijing airport by 8 robots

चीन / चीनमध्ये पहिली रोबोटिक पार्किंग ; बीजिंग विमानतळावर ८ रोबोटद्वारे केवळ एका मिनिटात होणार कारची पार्किंग

विमानतळावरील पार्किंगमध्ये १३२ कार पार्क होतील, क्यूआर कोड स्कॅनद्वारे गाडीची माहिती मिळेल

वृत्तसंस्था

Jun 29,2019 11:13:00 AM IST

चीनमधील बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिली रोबोटिक पार्किंग यंत्रणा उभी करण्यात आली आहे. येथे ८ रोबोट कारची पार्किंग करताना दिसून येतील. रोबोटिक पार्किंग सिस्टिममुळे गाड्या पार्क करण्यास फक्त १ मिनिटाचा कालावधी लागू शकतो. सध्या या यंत्रणेची चाचणी सुरू आहे. या महिन्याच्या शेवटी ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल. इंजिनिअर प्रभारी बा जनरल यांनी म्हटले, रोबोट्स एकदा चार्जिंग केल्यानंतर सहा तास काम करू शकतील. बॅटरी उतरली तर स्वत: चार्जिंग स्टेशनवर जाऊन उभे राहतील.

क्यूआर कोड स्कॅनद्वारे गाडीची माहिती मिळेल

स्मार्ट पार्किंगमध्ये क्यूआर कोड दिले आहेत. जर काेणी गाडीची नेमकी जागा विसरला तर क्यूआर कोड स्कॅन करून कार कोठे ठेवली आहे, याची माहिती करून घेईल.

X
COMMENT