आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Session Of 17th Lok Sabha Begins: Every Word Of Opponents Is Valuable, They Should Not Worry About There Seats Modi

१७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू: विरोधकांचा प्रत्येक शब्द मौल्यवान, त्यांनी संख्येची चिंता करू नये - मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी सुरू झाले. पहिल्या दिवशी सदस्यांनी शपथ घेतली. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. दुसऱ्या क्रमांकावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि तिसऱ्या क्रमांकावर गृहमंत्री अमित शहांनी शपथ घेतली. मंगळवारीही शपथविधी सुरू राहील. हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनी सर्व नव्या सदस्यांना शपथ दिली. त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीरेंद्रकुमार यांना हंगामी सभापतिपदाची शपथ दिली. लोकसभेत मोदींच्या शपथविधीवेळी भाजप खासदारांनी ‘मोदी-मोदी’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. तत्पूर्वी, मोदी संसदेबाहेर म्हणाले की, लोकशाहीत विरोधी पक्ष  सशक्त असणे गरजेचे आहे. त्यांचा प्रत्येक शब्द, भावना मौल्यवान आहे. त्यांनी लोकसभेत आपल्या संख्येची चिंता करू नये. मोदींनी ऊर्जावान विरोधकांच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, लोकशाहीत विरोधी पक्ष असणे, सक्रिय असणे आणि शक्तिशाली असणे अनिवार्य अट आहे.  विरोधकांनी संख्येची चिंता करू नये, अशी माझी अपेक्षा आहे. जेव्हा आपण खासदार म्हणून बसतो तेव्हा सत्ताधारी-विरोधक यापेक्षा निष्पक्षाची भावना जास्त महत्त्वाची आहे. आधीच्या तुलनेत अधिवेशने जास्त उपयुक्त ठरतील, असा मला विश्वास आहे.


साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या शपथेवर वाद : भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. त्यांनी आपल्या नावाचा उच्चार करताच विरोधकांनी आक्षेप घेत म्हटले की, त्यांनी फक्त आपले नाव उच्चारावे. साध्वींनी नावासोबत पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरीही जोडले होते.  विरोधक म्हणाले की, प्रज्ञा यांनी शपथपत्रात आपल्या गुरूचे नाव घेतले नाही.

 

सुषमांच्या जागेवर अमित शहा, अडवाणींच्या जागेवर गेहलोत

लोकसभेत पहिल्या दिवशी पहिल्या बाकांवरील दृष्य बदललेले दिसले. पीएम मोदींच्या बाजूच्या जागेवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह बसले. अमित शहांना सुषमा स्वराज यांची, थावरचंद गेहलोत यांना अडवाणींची जागा मिळाली. त्याशिवाय नितीन गडकरी, सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर आणि हरसिमरत कौर पहिल्या रांगेत बसले. त्यांच्यानंतर रामविलास पासवानही दिसले. पण ते यंदा लोकसभेचे सदस्य नाहीत. पण मंत्री असल्याने ते सभागृहात होते.

 

केरळचे काँग्रेस खासदार सुरेश यांनी हिंदीत, राहुल यांनी इंग्रजीत शपथ घेतली

केरळचे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार कोडिकुन्निल सुरेश यांनी हिंदीत शपथ घेतली. सभागृहाने त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सुरेश हे मोदींनंतर शपथ घेणार दुसरे सदस्य होते. ते सहाव्यांदा खासदार झाले. ते पहिल्यांदा १९८९ मध्ये खासदार झाले होते. १७ व्या लोकसभेत ते मावेलीकारा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

 

या खासदारांनी हिंदीत शपथ घेतली : नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अमित शाह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, अर्जुन मुंडा, किरण रिजिजू, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते, अर्जुन राम मेघवाल, जनरल व्ही. के. सिंह, कृष्ण पाल गुर्जर.
> संस्कृत: डॉ. हर्षवर्धन, श्रीपद येसो नाईक, अश्विनी चौबे, साध्वी प्रज्ञा.
> पंजाबी: हरसिमरत कौर बादल, डॉ. जितेंद्र सिंह. 
> मराठी: अरविंद गणपत सावंत, रावसाहेब पाटील दानवे.
> कन्नड: सदानंद गौडा, प्रल्हाद जोशी
> इंग्रजी : राहुल गांधी. 
> तेलुगू : जी. किशन रेड्‌डी.