आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये पगडीचा मान ठेवणारा Guardsman चरणप्रीतवर लागले गंभीर आरोप, नोकरीही जाण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वाढदिवस समारंभात जूनमध्ये शाही गार्ड्सच्या परेडमध्ये 22 वर्षांचा शिख चरणप्रीत सिंग लाल जगभरात चर्चेत आला. ब्रिटनच्या शाही गार्ड्सच्या इतिहासात पहिल्यांदाच वूलन टोपी न घालता एका सैनिकाने शिख पगडी घातली होती. त्याला तो अधिकार ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु, याच शिख गार्डवर आता अमली पदार्थांचे क्षमतेपेक्षा अधिक सेवन केल्याचे आरोप लागले आहेत. टेस्टमध्ये तो दोषी ठरला आहे. याप्रकरणात सविस्तर चौकशी केली जात असून त्याला आता नोकरी सुद्धा गमवावी लागण्याची शक्यता आहे. 


आता कमांडिंग ऑफिसर घेणार अंतिम निर्णय...
ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, चरणप्रीत आपल्या सहकाऱ्यांशी अमली पदार्थांवर चर्चा करत होता. त्यापैकीच एका सहकाऱ्याने त्याची तक्रार केल्यानंतर चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीमध्ये शाही गार्ड चनरप्रीतने मर्यादेपेक्षा अधिक अमली पदार्थ आणि कोकेन घेतल्याचे निष्पन्न झाले. आता चरनप्रीतची नोकरी राहणार की जाणार याचा अंतिम निर्णय चरणप्रीतचे कमांडिंग ऑफिसर घेणार आहेत. चरनप्रीतच्या रक्तात जितके कोकेन सापडले, त्यासाठी यापूर्वी सैनिकांना आपली लष्करी सेवा सोडावी लागली आहे. 


चरणप्रीत सिंग लालचा जन्म भारतातील पंजाबमध्ये झाला होता. यानंतर त्याचे आई-वडील ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यावेळी चरनप्रीत एक बाळ होता. चरनप्रीतने जानेवारी 2016 मध्ये ब्रिटिश आर्मी जॉइन केली. यानंतर त्याची निवड ब्रिटनच्या शाही गार्ड्समध्ये करण्यात आली. ब्रिटनमध्ये वूलनची टोपी न घालता पगडी घालून परेडमध्ये सहभागी होणारा तो पहिलाच शिख आहे. परंतु, एका चुकीमुळे त्याच्यावर ही नोकरी गमवण्याची वेळ आली आहे.

बातम्या आणखी आहेत...