Home | Khabrein Jara Hat Ke | first they did sterilization now giving compensation

आधी बळजबरीने केली नसबंदी, आता देत आहेत नुकसानभरपाई; ‘युजेनिक्स प्रोटेक्शन’ कायदा कारणीभूत

वृत्तसंस्था | Update - Apr 26, 2019, 11:35 AM IST

२५ हजार लोकांवर कारवाई, केवळ ८ हजार लोकांची परवानगी

  • first they did sterilization now giving compensation

    टोकियो - जपान सरकारवर एका कृतीमुळे माफी मागण्याची वेळ आली आहे. त्याला ‘युजेनिक्स प्रोटेक्शन’ कायदा कारणीभूत ठरला आहे. या अंतर्गत सरकारने बळजबरीने नसबंदी केली हाेती. मात्र, आता सरकारने पीडितांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.


    मुख्य सचिव योशिहिदे सुगा म्हणाले, आम्ही पीडितांची मनापासून माफी मागतो. जपानच्या संसदेने बुधवारी एका विधेयक मंजूर केले होते. त्यानुसार पीडिताला २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यासह पीडितांना मदत केली जाणार आहे. जपानमध्ये १९४८ ते १९९६ या दरम्यान २५ हजार लोकांची नसबंदी करण्यात आली होती. या कायद्यानुसार डॉक्टरांना अक्षम लोकांची नसबंदी करण्याची परवानगी होती. ४८ वर्षांत २५ हजारांवर लोकांची नसबंदी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ८ हजार लोकांचीच त्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. या लोकांनीदेखील दबावाखाली येऊन सहमती दर्शवली होती. युजेनिक्स कायद्यानुसार मानसिक पातळीवर अस्थिर, आजारी व आनुवंशिक विकृती असलेल्या व्यक्तींना या प्रक्रियांतून जाणे अनिवार्य असते. आगामी पिढ्यांत अशा प्रकारची विसंगती येऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला जातो. जर्मनी व स्वीडनमध्ये अशा प्रकारची व्यवस्था होती. पुढे त्यांनी पीडितांची माफी मागून नुकसान भरपाई दिली होती. जपानने अलीकडेच ही नसबंदी बेकायदा नव्हती, असे स्पष्ट केले होते. परंतु पीडितांनी सातत्याने निदर्शने करून सरकारवर दबाव वाढवला होता. त्यामुळे सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागला. त्याचबरोबर पीडितांना नुकसान भरपाई देण्याचेदेखील मान्य केले आहे.

    गतवर्षी १.८७ कोटींची नुकसान भरपाई मगितली होती
    भरपाईसाठी पीडित दीर्घकाळापासून संघर्ष करत आहेत. गतवर्षी नुकसान भरपाईची मागणी अधिक तीव्रतेने मांडण्यात आली. सरकारकडे पीडितांनी १.८७ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. आंदोलकांत एका महिलेचाही समावेश होता. १९७२ मध्ये शस्त्रक्रिया झालेल्यांचे वय तेव्हा १५ वर्षे होते.

Trending