आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधु बनणार 15 ट्रांसजेंडर्स, हिंदू पद्धतीने होईल लग्न, देशातील पहिली मिस ट्रांस क्वीनची असेल उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर(छत्तीसगड)- पहिल्यांदाच ट्रांसजेंडरांचा सामुहिक विवाह 30 मार्चला पार पडणार आहे. 15 ट्रांसजेंडर वधुच्या बणून आपल्या साथीदारासोबत सप्तपदी घेतली. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे या ट्रांसजेंडरांचे कन्यादान मुख्यमंत्री भूपेश बघेल करणार आहेत. शिवाय इतर मान्यवरही या कार्यक्रमात येणरा आहेत.

 

लैंगित समानतेकडे पहिले पाऊल
थर्ड जेंडर वेलफेअर बोर्डाच्या विद्या राजपूत यांनी सांगितले की, सामुहिक विवाहात भाग घेण्यासाठी 50 कपलने अर्ज भरला होता. यांत गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कोलकातावरून कपल आले आहेत. 15 कपल्सपैकी 6 कपल छत्तीसगडच्या रायपूर, कोरबा, रायगड आणि दुर्गसारख्या परिसरातून आले आहेत. हा विवाह पारंपारीक हिंदू पद्धतीने होईल. 29 मार्चला हळद आणि मेंदीचा प्रोग्राम सिविल लाइन्स स्थित आंबेडकर भवनात होईल. 30 मार्चला वरात दुपारी 1 वाजता आंबेडकर भवनातून पुजारी पार्कला जाईळ. तिथे लग्न सोहळा पार पडेल.आयोजन कमिटीमधल्या रवीना बरिहा म्हणाल्या की, हा सामुहिक विवाह सोहळ लैंगिक समानतेकडे पहिले पाऊल असेल. या कार्यक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये सामिल केले जाईल.


देशातील पहिली मिस ट्रांस क्वीन होईल आकर्षणाचे केंद्र
2018 मध्ये देशातील पहिली मिस ट्रांस क्वीनचा किताब जिंकणारी वीना सेन्द्रे कार्यक्रमातील मुख्य आकर्षणाचे केंद्र असेल. तिने मुंबईता झालेल्या नॅशनल लेव्हल ब्यूटी कॉन्टेस्टचा किताब आपल्या नावावर केला होता. वीना मिस छत्तीसगडदेखील जिंकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...