आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वित्झरलंड - येथील एका अॅडव्हेंचर स्पोर्ट्स झोनमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे सुटी साजरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने पहिल्याच दिवशी साक्षात मृत्यू अनुभवला. जीवनात पहिल्यांदाच या व्यक्तीने हँग ग्लायडरचा अनंद लुटण्याचा निर्णय घेतला. पण तयारीदरम्यान लोक त्याला सेफ्टी बेल्ट लावण्यास विसरले. त्यानंतर हवेत जे घडले ते पाहून सर्वांचाच थरकाप उडाला.
2 मिनटे घेतला मृत्यूचा अनुभव
क्रिस गस्की नावाच्या या व्यक्तीबरोबर एक ग्लायडर पायलटही होता. व्हिडिओत स्पष्ट दिसले की, दोघे 4 हजार फूट उंचीच्या शिखरावरून ग्लायडर घेऊन धावले पण लगेचच पायलटने म्हटले की, काहीतरी गडबड झाली आहे.
हवेत लटकला व्यक्ती
ग्लायडर हवेमध्ये येताच ख्रिस खाली पडू लागला. त्याचवेळी त्याने एका हातात ग्लायडरचे हँडल आणि दुसऱ्या हातात पायलटला घट्ट पकडले. जोरदार हवेमुळे ग्लायडर हवेत हलू लागले. ते हळूवारपणे खाली उतरवण्यासाठी पायलटला पूर्ण जोर लावाला लागला.
मनगट तुटले
हवेमुळे ग्लायडर इकडे तिकडे हवेच्या झोकात फिरत होते. त्याचवेळी क्रिसचे वजन एका बाजुला आले आणि त्याच्या हाताचे मनगट तुटले. सुमारे 2 मिनिट 14 सेकंदांपर्यंत मृत्यूची जाणीव झाल्यानंतर पायलटने ग्लायडरची इमर्जन्सी लँडिग केली आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेले.
तर झाला असता मृत्यू
ख्रिसने टेक ऑफ दरम्यान ग्लायडरचे हँडल पकडले नसते तर 4 हजार फूट उंचीवरून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असता. या संपूर्ण प्रकरणात कोणाचा निष्काळजीपणा आहे, याची पोलिस चौकशी करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.