आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शक आता मूकदर्शक, भाजपमध्ये प्रथमच अडवाणी विनातिकीट; प्रतिक्रियेस अडवाणी यांचा नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९९१ चे छायाचित्र. यात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीच अडवाणींचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा शहा भाजपचे प्रभारी होते. - Divya Marathi
१९९१ चे छायाचित्र. यात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीच अडवाणींचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा शहा भाजपचे प्रभारी होते.

नवी दिल्ली । भाजपने गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपचे संस्थापक व चार निवडणुकांत भाजप अध्यक्षपद सांभाळलेले लालकृष्ण अडवाणी यांचे नावच नाही. त्यांच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवतील. यादीत पंतप्रधान मोदी, दुसऱ्या क्रमांकावर शहा, नंतर राजनाथसिंह, नितीन गडकरी ही नावे होती. वयाच्या १४व्या वर्षापासून संघाशी नाते असलेले ९१ वर्षीय अडवाणी प्रथमच निवडणूक लढवू शकणार नाहीत. बी. एस. खंडुरी, भगतसिंह कोश्यारी व बिजॉय चक्रवर्ती यांचीही तिकिटे कापली आहेत. 

 

.. आता ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी व शांताकुमार
लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट पक्षाने कापले की त्यांनी स्वत:च यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला याबद्दल भाजपने अजूनही काही सांगितलेले नाही. विशेष म्हणजे अडवाणींच्या समर्थकांनीही यावर प्रतिक्रिया दिली नाही. अडवाणींकडे संपर्क साधला तेव्हा एवढेच उत्तर मिळाले की, ‘पक्षाचा निर्णय आहे, आम्हाला यावर काहीही म्हणायचे नाही.’ सूत्रांनुसार, आता मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार या दिग्गज आणि वयस्कर नेत्यांची तिकिटेही कापली जाणार आहेत.

 

 

तिकीट कापले कारण... 
> आयबीचा अहवाल व जानेवारी-मार्चच्या ३ संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाआधारे तिकिटे कापण्यात आली. शेवटचा सर्व्हे एअर स्ट्राइकनंतर झाला होता.
> मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या निकालावरून धडा... आणखी काही आमदारांची तिकिटे कापली असती तर या राज्यांत सरकारे टिकली असती. 
> याच सर्व्हेच्या आधारे १०० विद्यमान खासदारांची यंदाच्या निवडणुकीत  तिकिटे कापण्यावर विचार.

बातम्या आणखी आहेत...