• Home
  • National
  • first time Indian Army to start online registration of women for recruitment

पहिल्यांदाच सैन्य पोलिस दलात महिलांच्या भर्तीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी...


संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या- सैन्य पोलिस दलात महिलांना 20% जागा राखीव राहणार
 

दिव्य मराठी

Apr 25,2019 03:58:00 PM IST

नवी दिल्ली- सैन्य पोलिस दलाने पहिल्यांदाच महिलांच्या भर्तीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. संरक्षण मंत्रालयाने याची मंजुरी दिली आहे. जानेवारीमध्ये सैन्य पोलिस दलात महिलांना सामिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करून या माहितील दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, सैन्य पोलिस दलात महिलांसाठी 20% जागा राखीव राहतील. महिलांची भर्ती पीबीओआर(पर्सनल बिलो आफिसर रँक) रोलमध्ये केली जाईल.

आत्याचार आणि छेडछाडीची प्रकरणे सांभाळतील
सैन्य पोलिस दलात भर्ती केलेल्या महिला अधिकारी लैंगिक आत्याचार आणि छेडछाड सारख्या गु्न्हे सांभाळतील. सैन्य पोलिसांचे काम, कँटोनमेंट परिसरातील सैनिकांची सुरक्षा करण्याचे असते. सैन्य पोलिस शांती आणि युद्धाच्या वेळी जवान आणि त्यांना लागणाऱ्या सामानाला पोहचवण्याचे काम करते. सध्या सैन्य पोलिस दलात 800 महिलांची भर्ती केली जाणार आहे. महिलांच्या वार्षिक भर्तीचा वेग 52 असेल. आतापर्यंत सैन्यात मेडिकल, सिग्नल, एजुकेशन आणि इंजीनिअरिंग कोरमध्ये महिलांना भर्ती केले जाते. आता सैन्या पोलिस दलात त्यांना भर्ती केले जाणार आहे, त्यासोबतच युद्धातदेखील त्यांना सामिल करण्यावर विचार केला जात आहे.

सैन्यात महिलांची संख्या 3.80%
संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेता सांगितले की, सैन्यात महिलांचा वाटा 3.80% आहे. तर वायुसेनेत 13.09% आणि नौसेना 6% महिला आहेत.

X