Home | Sports | Cricket | Off The Field | First time organizing Street cricket world cup in England

जगात प्रथमच होणार 'स्ट्रीट क्रिकेट वर्ल्डकप', भारताचे दोन संघ; झोपडपट्टीत राहणारी मुले दाखवणार चमक

विनोद यादव | Update - Apr 15, 2019, 09:26 AM IST

इंग्लंडमध्ये ३० एप्रिल ते ८ मेपर्यंत पहिला स्ट्रीट क्रिकेट वर्ल्डकप; नऊ देशांचा सहभाग

 • First time organizing Street cricket world cup in England


  मुंबई - जगात प्रथमच स्ट्रीट चाइल्ड वर्ल्डकपचे आयोजन केले जाणार आहे. यात जगभरातील झोपडपट्टीत राहणारी मुले सहभागी होतील. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड््सच्या मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतातील १६ मुलेही सहभागी होत आहेत. ३० एप्रिल २०१९ ते ८ मे २०१९ या काळात ही विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यात भारतातील एकूण दोन संघ सहभागी होत असून यातील एक टीम इंडिया नॉर्थ आणि दुसरी टीम इंडिया साऊथ असेल. इंडिया नॉर्थ संघाची बांधणी 'सेव्ह द चिल्ड्रन' आणि कोलकाता येथील होप फाउंडेशनने संयुक्तपणे केली आहे, तर इंडिया साऊथ संघ मॅजिक बस आणि करुणालय या सेवाभावी संस्थेचा आहे. या चारही संस्था भारतात स्ट्रीट चिल्ड्रनसाठी काम करतात. या स्पर्धेचे लंडनमधील आयोजन स्ट्रीट चाइल्ड युनायटेड ही संस्था करत आहे.

  ... म्हणून या मुलांमध्ये अनोखा उत्साह

  प्रथमच सर्वांनी पासपोर्ट काढला
  या सोळा मुलांचा प्रथमच पासपोर्ट काढण्यात आला. त्यांच्या कुटुंबातही आतापर्यंत कुणाचाच पासपोर्ट काढण्यात आलेला नाही. शिवाय या मुलांचा हा पहिलाच विमान प्रवास असेल.

  चार सामने केंब्रिजमध्ये...
  स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्डकपचे चार सामने केंब्रिजमध्ये होतील. ते २० बॉल मॅच असतील. या स्पर्धेतील अंतिम सामना ८ मे रोजी ऐतिहासिक लॉर्ड््सच्या मैदानावर होईल.
  क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड््सवर अंतिम सामना

  अशी झाली मुलांची निवड
  सेवाभावी संस्थांनी अर्ज मागवले. इंडिया नॉर्थसाठी ६० हून अधिक अर्ज आले होते. नंतर निवड प्रक्रिया सुरू झाली. २० मुलांची निवड करून यातील ८ नावे निश्चित करण्यात आली.

  प्रथमच अशा वर्ल्डकपचे आयोजन
  क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच या प्रकारच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मॉस्कोमध्ये फुटबॉलची अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Trending