आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - टेनिस जगतातील दोन सर्वात मोठे स्टार रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांच्यात प्रथमच सामना झाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या होपमॅन कप स्पर्धेच्या मिक्स्ड डबल्स सामन्यात रॉजर फेडरर आणि बेलिंडा बेनसिस यांची जोडी विजयी ठरली. त्यांनी अमेरिकेच्या फ्रान्सेस टिफोई-सेरेना जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
ही मॅच पाहण्यासाठी 14 हजाराहून अधिक फॅन्स पोहोचले होते. हा स्पर्धेतील एक नवा विक्रम ठरला. यापूर्वी सिंगल्समध्ये सेरेना आणि फेडरर दोघांनी त्यांचे सामने जिंकले होते. मिक्स्ड डबल्सची मॅच जिंकत स्वित्झरलंडने सामना 2-1 ने जिंकला होता.
फेडरर म्हणाला नर्व्हस होतो
मॅचनंतर फेडरर म्हणाला की, सगळे सेरेनाच्या सर्व्हीसबाबत का बोलतात हे मला आता समजले. तुम्ही तिची सर्व्हीस समजूच शकत नाही. मी तर तिला सर्व्हीस करतानाही नर्व्हस होतो कारण ती चांगला रिटर्नही करते. तर सेरेना म्हणाली की, मी फेडररची सर्व्हीस समजूच शकले नाही. तो एक महान खेळाडू आहे. मला आज समजले की, तो एक चांगला व्यक्तीही आहे. येथे खेळण्यात आलेला सामना मी कधीही विसरू शकणार नाही.
या जोडीकडे आहेत 43 ग्रँडस्लॅम
सेरेनाने 23 तर फेडररने 20 वेळा ग्रँड स्लॅम सिंगल्सचे किताब जिंकले आहेत. म्हणजे या जोडीकडे एकूण 43 किताब आहेत. दोघे एकूण 629 आठवडे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहेत. त्यात सेरेना 319 आणि फेडरर 310 आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दोघे उतरणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.