Home | International | Other Country | first time tennis match played in international space station at zero gravity

प्रथमच Space मध्ये झाली टेनिस मॅच, अॅस्ट्रॉनॉट्सने केली US Open ची सुरुवात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 25, 2018, 11:52 AM IST

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर प्रथमच टेनिसचा सामना खेळण्यात आला आहे.

  • first time tennis match played in international space station at zero gravity

    वॉशिंग्टन - अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर प्रथमच टेनिसचा सामना खेळण्यात आला आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी आणि यूएस टेनिस असोसिएशनने अमेरिकन ओपन चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर या अनोख्या सामन्याचे आयोजन केले होते. यात कमांडर अँड्रयू फ्यूसटल, यूरोपियन स्पेस एजन्सीचे तीन फ्लाइट इंजिनिअर आणि नासाचे दोन अॅस्ट्रोनॉट सहभागी झाले होते. स्पेस स्टेशनमध्ये गुरुत्वाकर्षण कमी असल्याने टेनिस बॉल उचकूच शकली नाही.

    सामन्याचे प्रक्षेपणही झाले...
    स्पेस स्टेशनमध्ये झालेल्या या सामन्याचे प्रसारण करण्यासाठी एक ग्लोब सदृश्य स्कल्पचर तयार करण्यात आले होते. हे स्कल्पचर न्यूयॉर्कच्या बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या बाहेर लावण्यात आले होते. मॅचचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल होत आहेत.

Trending