Home | Maharashtra | Vidarva | Akola | first time women participate in historical Kavad Yatra

ऐतिहासिक कावड यात्रेत पहिल्यांदाच महिलांचा सहभाग; शिवभक्तांचा उत्साह अन् देखाव्यांचे आकर्षण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 11:36 AM IST

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने अभिषेक करण्याच्या

 • first time women participate in historical Kavad Yatra

  अकोला- श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने अभिषेक करण्याच्या परंपरेनुसार शिवभक्त मंडळांनी कावडीद्वारे पाणी आणून राजेश्वराला जलाभिषेक केला. रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी या उत्सवाचा समारोप झाला.


  जोपासली ३५ वर्षांची परंपरा
  जयहिंद चौक येथे स्व. मांगीलाल शर्मा, स्व. शंकरलाल खंडेलवाल, स्व. प्रमिलाताई टोपले यांची परंपरा स्व. गणेश ढगे यांना सोबत घेऊन आमदार गोवर्धन शर्मा यांनी जयहिंद चौक येथे ३५ वर्षांपूर्वी शिवभक्तांचे स्वागत करण्याची परंपरा आरंभ केली. आज जयहिंद चौकात आमदार शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, सुमन गावंडे, सतीश ढगे, डॉ. विनोद बोर्डे, गिरीश जोशी, विजय इंगळे, आशा जोशी, प्रतुल हातवळणे, उपस्थित होते. या वेळी अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान, संजय जिरापुरे यांनी भक्तांचे श्रीफळ, दुपट्टे व फलाहार देऊन स्वागत केले. या वेळी उज्जैन ओंकारेश्वर येथून कावड घेऊन येणाऱ्या ७ शिवभक्तांचा सत्कार केला. द्वारका सोमनाथ सह दहा ज्योतिर्लिंग येथून जल आणणारे पराते, सुळे, धुर्वे यांचा सत्कार केला. कावड पालखी उत्सवात जखमी िशवभक्तांवर शिवाजी पार्कसमाेर प्रथमाेपचार केले. या वेळी शिवभक्तांना अाैषधींचे िवतरणही केले. ३०० पेक्षा जास्त शिवभक्तांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.


  शिवाजी पार्क येथे रुग्णवाहिका सज्ज हाेती. राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने अभिषेकासाठी कावडधारी शिवभक्त गांधीग्राम येथील जल घेऊन अकाेल्यात आले. या वेळी जखमी शिव भक्तांवर उपचार केले. यासाठी रुद्रावतार शिवभक्त मंडळाने पुढाकार घेतला. या सेवेत डॉ अमोल रावणकार , विवेक महल्ले , अभिजित मोरे, पवन महल्ले , सागर तिवारी , संदीप बाथो व शिवभक्त मंडळ सहभागी झाले होते.


  शेवटची पालखी ९ वाजून ५ मिनिटांनी आली. पहिल्यांदाच कावड पालखी उत्सवाची सांगता रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी झाली. यापूर्वी मध्यरात्रीपर्यंत पालखी उत्सव सुरुच राहत होता. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलिस ठाणेदार अन्वर एम. शेख, सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनानुसार हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

  रस्त्याची होती दुरवस्था
  पाचमोरी ते गांधीग्राम दरम्यान रस्ता नादुरुस्त आहे. कावड यात्रेपूर्वी रस्त्याची डागडुजी करून शिवभक्तांना चालण्यासाठी सोयीचा करून द्यावा यासाठी मागणी करण्यात आली होती. रस्त्याच्या डागडुजीच्या नावाखाली जणू रस्ता आणखी खराब झाला. रस्त्यावर बारीक चुरी टाकल्याने शिवभक्तांच्या पायांमध्ये ती आतपर्यंत रुतली. याने अनेकांचे पाय फाटले.


  १५७१ भरण्यांची होती मोठी कावड
  जय भवानी मित्र मंडळ हरिहर पेठची यंदा सर्वात मोठी १५७१ भरण्यांची कावड होती. यासह डाबकीरोड वासी शिवभक्त मंडळ, जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, देशमुख पेठ शिवभक्त मंडळ यांच्या कावड मोठ्या होत्या.


  जर्मन पॉलीनाने घेतला आनंद
  भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी आलेली जर्मनीची पॉलीना हेसलरने कावड महोत्सवाचा आनंद घेतला. रोटरी क्लब अॅग्रोसिटीचे शशांक जोशी, संपदा जोशींसह तिने कावड महोत्सव पाहिला. पुस्तकात वाचलेली भारतीय संस्कृती प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लोकांना एकत्र उत्सव साजरा करताना पाहत असल्याचे तिने सांगितले.


  शिवाजी पार्क येथे माजी
  महापौर सुरेश पाटील यांच्यातर्फे प्रथमोपचार केंद्र सुरू करून शिवभक्तांची सेवा केली. गांधीग्राम पासून पायी निघालेल्या ३०० शिवभक्तांवर उपचार केले. जळगाव खान्देशचे डॉ. धनराज चौधरी, डॉ. संदीप पाटील, डॉ. चंद्रकांत पनपालिया, डॉ. आशिष पनपालिया यांनी उपचार केले. सुरेश पाटील, त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांनी पुढाकार घेतला.


  चिमुकल्यांची पारंपरिक कावड
  पूर्वी भोपळ्याच्या कावडची परंपरा होती. ती आता स्टीलच्या भरण्यांनी घेतली. मात्र, अनेक चिमुकले आजही ग्रुपने तसेच परिवारासोबत पारंपरिक भोपळ्याची कावड आणतात. जुनी परंपरा जोपासण्याचे काम ते करत आहे.


  व्यसनमुक्तीचा संदेश...
  कावड उत्सव साजरा करताना लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी काही लोक प्रबोधनात्मक देखावे सादर करतात. असेच यावर्षी सुनील गोहर यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारा देखावा साकारला. पारंपरिक भोपळ्याच्या कावड सोबत समाजात व्यसनमुक्तीचे प्रबोधन त्यांनी केले.

 • first time women participate in historical Kavad Yatra
 • first time women participate in historical Kavad Yatra

Trending