आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील पहिले Underwater Hotel; एक रात्र घालवण्यासाठी मोजावे लागतील 36 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - मालदीवचे एक रिसॉर्ट आपल्या पाहुण्यांना समुद्राच्या आत झोपण्याची मजा देण्यासाठी सज्ज आहे. कोनार्ड मालदीव रंगाली आयलंडवर 108 कोटी रुपये खर्च करून 2 मजली रिसॉर्ट बनवण्यात आले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, इमारतीचा अर्धा भाग समुद्रावर आणि अर्धा भाग समुद्राखाली आहे. समुद्रात बांधलेले हे जगातील पहिलेच हॉटेल आणि बांधकाम मानले जात आहे. याच महिन्यात हॉटेलचे उर्वरीत काम सुद्धा पूर्ण झाले आहे. परंतु, या हॉटेलमध्ये पर्यटकांना एक रात्र घालवण्यासाठी तब्बल 36 लाख रुपये मोजावे लागतील. 


मुराका नावाच्या या रिसॉर्टचा हेतू आपल्या गेस्टला समुद्रातील जीवन दाखवणे आहे. या बंगल्यात जिम, बार, पूल, क्वार्टर्ससाठी बटलर, समुद्राजवळ बाथटब आणि अंडरवॉटर बेडरुम सुद्धा आहे. किंग साइज बेड असलेल्या या बंगल्यातील बेडरुममध्ये बाथरुम सुद्धा आहेत. अंडरसी बंगल्याचा अर्धा भाग वरच्या भागाला जोडण्यासाठी स्पायरल पायऱ्या आहेत.  हॉटेलचा वरचा भाग सी फेसिंग असून 550 चौरस मीटर असा प्रशस्त आहेत. तर खालचा भाग 102 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आला आहे. 

 

मुराका विलामध्ये एकाचवेळी 9 पर्यटक थांबू शकतील अशी क्षमता आहे. अंडरवॉटर डिझाईन स्पेशलिस्ट एम जे मर्फी या खासगी संस्थेने ते डिझाईन केले आहे. या व्यतिरिक्त पेम्बा आइलंडवर मान्ता रिसॉर्टमध्ये सुद्धा एक रुम अंडरवॉटर आहे. पण, बंगलाच अंडरवॉटर असलेले हे जगातील पहिले ठिकाण मानले जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...