आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking:मृत्यूचा जगातील पहिला Video, आयफेल टॉवरवरून मारली उडी पण पॅराशूट झाले फेल, सर्वांसमोर झाला अंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - आपण प्रत्येक जण रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो. त्यात अनेक व्हिडिओ साक्षात मृत्यूचेही असतात. पण मृत्यूचा जगातील पहिला व्हिडिओ कधी समोर आला होता हे तुम्हाला माहिती आहे का? याचे उत्तर आहे 1912 मध्ये. हा व्हिडिओ होता Franz Reichelt नावाच्या व्यक्तीचा. त्याला जगात पॅराशूटचे पायोनियर म्हटले जाते. ते फ्रान्समधील एक टेलर होते. 

 

Franz यांनी एक असा सूट तयार केला होता जो उंचीवरून उडी मारल्यानंतर पॅराशूटमध्ये बदलतो. Franz यांनी डमीबरोबर याची यशस्वी चाचणीही केली होती. पण मानवावर प्रयोग करून त्यांना हा शोध सिद्ध करायचा होता. त्या साठी त्यांनी सरकारकडून कायदेशीर परवानगीही घेतली होती. 4 फेब्रुवारी 1912 ला पॅरिसच्या आयफेल टॉवरवरून उडी मारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. Franz सूट परिधान करून टॉवरवर चढले. त्यांचा हा प्रयोग पाहायला अनेक लोक आले होते. यासाठी व्हिडिओ कॅमेरेही लावण्यात आले. Franz यांनी सूट परिधान करून ज्याप्रमाणे ठरले होते अगदी तशीच उडी मारली. पण मध्ये अघटीत घडले. सूट फेल ठरला आणि त्याचे पॅराशूट तयारच झाले नाही. Franz झेट जमिनीवर येऊन पडेल आणि त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की, मृत्यूची रेकॉर्डींग झाली असेल असा हा जगातील पहिलाच व्हिडिओ होता. 

बातम्या आणखी आहेत...