आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीमध्ये रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा पहिला Video आला समोर, व्हाइट ड्रेसिंगमध्ये दिसले नवदाम्पत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. न्यूज एजेंसी ANI व्दारे हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. वेडिंग वेन्यूच्या खुप लांबून हा व्हिडिओ घेण्यात आला आहे. पण यामध्ये रिसॉर्टच्या टेरेसवर वेडिंग फंक्शन होताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त लोकांनी व्हाइट कपडे घातलेले दिसत आहे. कोंकणी पध्दतीत असे कपडे घातले जातात. बुधवारी कोंकणी पध्दतीने लग्न केल्यानंतर गुरुवारी दीपवीर सिंधी पध्दतीने लग्न करणार आहेत. लग्नापासून मीडियाला दूर ठेवण्यात आले. यासोबतच पाहूण्यांच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली. पाहूण्यांच्या मोबाइल कॅमेरावर स्टिकर चिपकवण्यात आले आहेत. याच कारणांमुळे अजून कोणताही स्पष्ट फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. 


सोशल मीडिया यूजर्स करत आहेत ट्रोल 
- दीपिका आणि रणवीरच्या लग्नावर आता सोशल मीडिया यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, "भारतात लग्न करण्यात लाज वाटते का?" तर एका यूजरने लिहिले, "जर भारतात लग्न केले असते तर जास्त लोकांना बोलवावे लागले असते. यामुळे त्यांचे बजेट वाढले असते." एका यूजरने खिल्ली उडवत लिहिले की, "जर भारतात लग्न केले असते तर छोटा भीम सारखा मुलगा झाला नसता, म्हणून इटलीमध्ये केले."

 

 

बातम्या आणखी आहेत...