आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानातील पहिले योग केंद्र, येथे महिलांना युद्धजन्य परिस्थितीतही शांत जगणे शिकवले जाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - अफगाणिस्तानात ३ वर्षांपूर्वी सुरू झालेले देशातील एकमेव योग केंद्र. फख्रिया मुमताज नावाची महिला हे केंद्र चालवते. येथील महिलांना कट्टरवाद व युद्धजन्य परिस्थितीतही शांततेत जीवन कसे व्यतीत करावे हे शिकवले जाते.  दिवसभर सुरू असलेल्या या केंद्रात सुमारे १०० महिला येतात. येथील वातावरण चांगले राहावे म्हणून गाणीही ऐकवली जातात. फख्रिया म्हणाल्या, आमच्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून युद्धच सुरू आहे. येथील लोकांना शांतता हवी आहे. परंतु तुमचे मन अस्थिर असेल तर शांतता मिळणे अवघड आहे. यामुळेच त्यांनी योगाद्वारे महिला व मुलींना शांततेत कसे जगावे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्या लहानपणापासून क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत. े. त्यांनी पतीच्या आयटी कंपनीच्या परिसरातच योग केंद्राची सुरुवात केली आहे.    


ज्या महिला वर्गात येऊन योग करू शकत नाहीत त्यांंच्यासाठी मोबाइल अॅप  
फख्रिया यांनी सांगितले, काही महिलांना योग केंद्रात येण्याची परवानगी मिळत नाही अथवा वेळ कमी असतो. परंतु त्यावरही आम्ही उपाय शोधून काढला आहे. त्यांच्यासाठी आम्ही मोबाइल अॅप तयार करत आहोत. मी स्टार्टअप सुरू करण्यासाठी अमेरिकेतील एका स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचले आहे. जिंकले तर महिलांना घरबसल्या योग करता येतील, असे अॅप बनवणार आहे.  


येथे येऊन आम्ही भीती सोडून देतो  
दाेन वर्षांपासून योग केंद्रात येणाऱ्या महदिया झाेया (२१) हिने सांगितले, एका तासाच्या काळात आम्ही युद्ध, तेथील परिस्थिती आणि भीती वाटणे सोडून देतो. त्यानंतरच आमच्या मनाला शांतता मिळते. यानंतर सकारात्मक गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो. फख्रिया यांनी सांगितले, मी योग शिकलेली नाही, परंतु भारतात आले होते तेव्हा ७२ तास चाललेल्या इंटरनॅशनल योग शिबिरात त्यांनी भाग घेतला.  तेथूनच वेगवेगळे आसन प्रकार शिकून येथे योग केंद्र उघडले.

बातम्या आणखी आहेत...