Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | fisher youth trained ratnagiri organisation

रत्नागिरीत मिळणार मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण

divya marathi team | Update - May 20, 2011, 05:16 PM IST

रत्नागिरीतील मच्छीमार तरुणांना एक जुलैपासून मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  • fisher youth trained ratnagiri organisation

    रत्नागिरी - रत्नागिरीतील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यालयातर्फे मच्छीमार तरुणांना एक जुलैपासून मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    या प्रशिक्षणासाठी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात तरुणांना नौकानयनाची तत्त्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीन डिझेल इंजिनची देखभाल व निगा याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी त्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या आत असावे. अर्ज करताना जन्मतारखेच्या दाखल्यासह शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्याची झेरॉक्‍स प्रत जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवाराला प्रत्यक्ष समुद्रावरील मासेमारीचा अनुभव तसेच पोहता येणे आवश्‍यक आहे.

    या प्रशिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. तरुणांनी आपले अर्ज 4 जून 2011 रोजी किंवा त्यापूर्वी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी कार्यालयाकडे पोहोचतील असे पाठवावेत.Trending