Home | Khabrein Jara Hat Ke | fisherman found 50 year old bottle at sea shore

ऑस्ट्रेलियात मच्छीमाराला किनाऱ्यावर सापडली 50 वर्षे जुनी बाटली, त्यात होती चिठ्ठी

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 18, 2019, 04:22 PM IST

संदेशात 13 वर्षीय पॉल गिब्सनच्या ऑस्ट्रेलिया प्रवासाचे वर्णन आहे

  • fisherman found 50 year old bottle at sea shore

    सिडनी- 50 वर्षांपूर्वी एका ब्रिटीश मुलाने चिठ्ठी लिहून काचेच्या बाटलीत टाकलेला संदेश ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीवर एका मच्छीमाराला सापडला. पॉल इलियट नावाच्या मच्छीमाराने सांगितले की, तो आपला मुलगा जेहासोबत मासे पकडताना त्याला एक बाटली सापडली. त्यावर एक संदेश लिहीला होता, तो संदेश 50 वर्षे जुना आहे. आता तो आणि त्याचा मुलगा मिळून ती चिठ्ठी लिहीणाऱ्या व्यक्तीला शोधणार आहे.


    संदेशात 13 वर्षीय पॉल गिब्सनच्या ऑस्ट्रेलिया प्रवासाचे वर्णन आहे. बाटली इतक्या दिवस समुद्रात कसकाय तरंगली, यावरही अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. एका ओसियनोग्राफर डेविड ग्रिफिनने सांगितले की, बाटली 50 वर्षे तरंगत राहू शकत नाही.

Trending