आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुमात्रा - इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये मच्छिमारांच्या एका गटाचा 27 फुटांच्या विशालकाय अजगराशी सामना झाला. मच्छिमार याठिकाणी एका जंगलामध्ये पाण्यात मासे पकडत होते. मासे पकडताना एक मच्छिमार दुसऱ्या बाजुला जाळे घेऊन उभा राहिला. त्याला वाटले की, तो लाकडाच्या एका जाड ओंडक्यावर उभा आहे. पण लगेचच त्याला जाणवले की, त्याच्याकडून मोठी चूक झाली आहे. कारण तो लाकडाचा ओंडका नव्हता तर एक विशालकाय अजगर होता.
100 किलोचा अजगर
- मच्छिमाराला काही लक्षात यायच्या आधी अजगराने त्याला वेटोळे घालून दाबण्यास सुरुवात केली. इतर मच्छिमार अजगराचे तोंड दाबण्यासाठी सरसावले. अजगराने मच्छिमाराला गिळण्याचा प्रयत्न करू नये म्हणून त्यांनी त्याचे तोंड दाबले.
- पण तो अजगर एवढ्यात कसा ऐकणार. जवळपास 100 किलोचा अजगर आणि मच्छिमारांमध्ये युद्ध सुरू झाले. हा अजगर एवढा शक्तीशाली होता की, त्याने वेटोळे घातल्याने मच्छिमार एकडून तिकडे पडू लागले होते.
मच्छिमारांना पकडले
अजगराने स्वतःचा बचाव करण्यासाठी मच्छिमाराला सर्व बाजुंनी वेटोळे घालण्यास सुरुवात केली. अजगराच्या तावडीत त्याचा पाय सापडला होता. इतर मच्छिमार त्याचे वेटोळे काढण्याचा प्रयत्न करत होते.
आसपासच्या गावातील लोकही आले
मच्छिमारांचा आवाज ऐकूण जवळपासच्या गावातील मासे पकडण्यासाठी आलेले लोकही त्याठिकाणी आले. त्यांनी परिश्रम करत मच्छिमाराला अजगराच्या तावडीतून सोडवले. मच्छिमारांनी सांगितले की, जर सर्वांनी शक्ती लावून अजगराला थांबवले नसते तर त्याने पकडलेल्या मच्छिमाराच्या हाडांचा चुरा केला असता.
पकडून गावात ठेवला अजगर
गावकऱ्यांनी हा अजगर पकडून त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवले. पण वन विभागाला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तो अजगर परत जंगलात सोडला. वन विभागाच्या एक्सपर्ट्सच्या मते, अजगराची Python Reticulatus ही प्रजाती जगात सर्वात मोठी असते. यांची लांबी 30 फुटांपर्यंत असते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.