Apple iPhone युझर्ससाठी / Apple iPhone युझर्ससाठी धोक्याचा इशारा, एक कॉल करू शकतो तुम्हाला बर्बाद

दिव्य मराठी वेब टीम

Jan 07,2019 10:09:00 AM IST


नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत ई-मेलने फिशिंगद्वारे फसवेगिरी होत असल्याचे ऐकले किंवा वाचले असेल. पण आता लोकांना फसविण्यासाठी चतुर लोकांनी फिशिंगची नवीन पद्धत अवलंबली आहे. विशेष म्हणजे हे गुन्हेगार फक्त Apple IPhone वापरणाऱ्या लोकांना जाळ्यात ओढत आहेत. अशात तुम्ही जर Apple IPhone वापरत असाल तर सावध व्हा. अन्यथा तुम्हालाही मोठे नुकसान सहन करावे लागेल.


ही आहे फिशिंगची नवीन पद्धत

टेक क्रंचच्या एका रिपोर्टनुसार, गुन्हेगारांनी लोकांना फसविण्यासाठी फिशिंगची नवीन पद्धत वापरत आहेत. अॅपल आयफोनच्या युझर्सला एक कॉल करत आहेत. याकडे पाहून तो कॉल अॅपल सपोर्टकडून आला असल्याचे वाटते अशाप्रकारेच एका अॅपल आयफोन युझर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कॉलबॅकद्वारे करण्यात येते फिशिंग

रिपोर्टनुसार कॅलेफॉर्नियाच्या Jody Westby नावाच्या एका अॅपल युझरला कॉल आला. कॉल करण्यात आलेल्या त्याच नंबरवर पुन्हा कॉलबॅक करण्याचे सांगितले. Jody Westby कॉलबॅक करताच स्वयंचलित मशीनने कॉल करण्याचे कारण विचारले. यावर Jody Westby ने नंबरवर कॉल करण्यास सांगितले असल्याचे म्हटले. यावर दुसरीकडून कोणतेही उत्तर आले नाही आणि थोड्यावेळाने कॉल कट करण्यात आला.

Apple ने जारी केली चेतावनी

हे प्रकरण समोर आल्यानंतर अॅपलने आपल्या आयफोन युझर्ससाठी एक चेतावनी जारी केली आहे. अॅपलने सांगितले की, अॅपल सपोर्टकडून आपल्या कोणत्याच युझरला अशाप्रकारचा कॉल करत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचा कॉल आल्यास त्यावर आपली व्यक्तिगत किंवा आर्थिक माहिती देऊ नका.

X
COMMENT