आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

76 वर्षांचे ‘तरुण’ : दररोज 16 तास काम करतात अमिताभ, एकेकाळी दारु आणि दिवसाला 100 सिगारेट ओढायचे, आज चहासुद्धा घेत नाहीत, बिग बींच्या फिटनेसचे 6 Secrets

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज 76 वर्षांचे झाले आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या बिग बींचा कामाचा उत्साह तरुणाईला लाजवणारा आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या ट्रेनर आणि डायटिशिअन असलेल्या वृंदा मेहतांच्या मार्गदर्शनाखाली नियमित वर्कआउट करतात. याच कारणामुळे ते या वयातही अगदी फिट आहेत. अमिताभ जेव्हा 25 वर्षांचे होते, तेव्हा आठ ते 10 तासांची झोप घ्यायचे पण आता ते फक्त 5 ते 6 तासच झोपतात. बिग बींच्या मते, जेव्हा गरज असते, तेव्हा ते झोप घेत असतात. एक काळ असा होता, जेव्हा कोलकाता येथे नोकरी करत असताना ते दिवसाला 100 सिगारेट ओढायचे. पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी हे व्यसन सोडले. जाणून घेऊयात वयाच्या 76 व्या वर्षी अमिताभ यांनी स्वतःला कसे तरुण ठेवले...


अमिताभ यांचे फिट राहण्याचे 6 सिक्रेट्स... 

 

स्मोकिंग करत नाहीत...

मोठ्या पडद्यावर बिग बी अनेकदा आपल्याला सिगारेट ओढताना दिसले आहेत. पण खासगी आयुष्यात ते कधीही स्मोकिंग करत नाहीत. स्मोकिंग न करणे हे त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे. कारण स्मोकिंग शरीरावर वाईट परिणाम करते.

 

अल्कोहल, चहा-कॉफी पित नाहीत... 
अमिताभ अल्कोहॉलिक ड्रिंक आणि चहा, कॉफीदेखील पित नाहीत. अभ्यासानुसार, अल्कोहल पिल्याने ब्रेन, हार्ट, लिव्हर आणि इतर ऑर्गन्स खराब होतात. तर चहा-कॉफीसुद्धा शरीरासाठी हानीकारक आहेत.

 

गोड अवॉइड करतात...
पेस्ट्री आणि केकसह अनेक गोड पदार्थ खाणे अमिताभ टाळतात. कारण गोड पदार्थांमध्ये हाय कॅलरीज असतात, ज्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.

 

नॉनवेज फूड खात नाहीत... 
अमिताभ बच्चन शुद्ध शाकाहारी आहेत, ते मांसाहार करत नाहीत. जेवणात ते बॅलेन्स डाएट घेतात.

 

वर्कआउट करायला कधीच विसरत नाहीत...
बिग-बी कधीही वर्कआउट करायला विसरत नाहीत. सकाळी ते योगा करतात. शूटिंगच्या काळातदेखील ते व्यायामासाठी आवर्जुन वेळ काढत असतात.

 

मध खातात...
अमिताभ बच्चन यांच्या सूनबाई ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण फिट राहण्यासाठी दररोज एक चमचा मध घेतो. 

 

वयाच्या 76 व्या वर्षी 16 तास करतात काम, असे आहे रुटीन... 
- अमिताभ सकाळी साडे पाच वाजता उठून मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करतात. त्यानंतर शूटिंग असल्यास शूटिंगसाठी निघून जातात किंवा मीटिंग करतात.


- संध्याकाळी ते त्यांच्या ब्लॉगमध्ये बिझी होतात. दररोज रात्री बारा ते साडे बाराच्या सुमारास ते झोपतात.


- दररोज 16 तास कारम करणा-या बिग बींनी अलीकडेच यशराज फिल्म्सच्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशवाय ते ब्रम्हास्त्र या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट बुल्गारिया येथे चित्रीत झाला. 


- बिग बी सध्या केबीसीच्या शूटिंगमध्येही बिझी आहेत. याशिवाय ते सामाजिक कार्यातही अग्रसेर असतात. स्वच्छ भारत अभियानासाठी ते वेळोवेळी शूट आणि व्हॉइस ओव्हर देत असतात. गेल्या 30 वर्षांपासून दर रविवारी त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर त्यांचे चाहते त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.  

बातम्या आणखी आहेत...