आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वी नापास वधु लग्नाच्या 5 दिवसानंतर बोलू लागली फाड-फाड इंग्रजी, ते पाहून कन्फ्यूज झाला पती, पण सत्य समोर येताच पत्नीला रूममध्ये केले बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाजापूर/उज्जैन(मध्यप्रदेश)- लग्नाच्या 5 व्या दिवशी 5 वी नापास वधुची फाड-फाड इंग्रीज ऐकून हैराण झाले कुटुंबीय. मुलाला कळाले की, त्याच्यासोबत घात झाला आहे. पीडीत तरूणाने सोमवारी लुटेऱ्या वधुची सगळी गोष्ट पोलिसांना सांगितली. त्याने सांगितले- शिवानी उर्फ पुजावर तर त्याला लग्नाच्या पाचव्या दिवशीच संशय आला होता, कारण ज्या मुलीला 5 वी नापास सांगण्यात आले होते, ती एकदम चांगली इंग्रजी बोलू लागली. ते ऐकून त्याला कळाले की, हे प्रकरण काही वेगळेच आहे, त्यामुळे कोणालाही काही न सांगता तिला रूममध्ये बंद केले. या दरम्यान पुजाची मैत्रीण शबाना तिला सोडवण्यासाठी 40 हजार रूपये घेऊन पोलिस ठाण्यात पोहचली, तेव्हा लुटेऱ्या वधुच्या गँगचा खुलासा झाला.


घराचे दारे बंद केली
22 जानेवारीला लग्न झाल्यानंतर पुजा घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवत होती, पण युवकाला संशय आल्याने त्याने तिला रूममध्ये बंद केले. 26 जानेवारीला कसेबसे तिने त्याच्या तावडीतून पळ काढला, कारने पळून जात असताना युवकाने बाईकवरून तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले. पकडल्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात दिले, पोलिसांनी चौकशी केल्यावर या गँगचा खुलासा झाला.
 

बातम्या आणखी आहेत...