आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एसटी बसमध्ये घुसली कार, मुंबईच्या 5 जणांचा जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पंढरपूर-सोलापूर मार्गावर कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील देगावजवळ शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला.

 

मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली होती. यावळी देगाव हद्दीत आले असता समोरून येणार्‍या भरधाव कारने बसला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की कार बसच्या निम्म्यापर्यंत आत घुसली. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

दरम्यान, अपघातातील एका जखमी मुलाला उपचारासाठी पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त सर्व लोक मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून प्रचंड गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...