Home | Maharashtra | Vidarva | Akola | Five family members died in road accident in Buldana

बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार, पाच जखमी तर दोन गंभीर, गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना काळाने घातला घाला

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 04:57 PM IST

गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

  • Five family members died in road accident in Buldana

    बुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Trending