आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम विदर्भात वीज पडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यातील तिघांचा समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात शेतात पेरणी करताना वीज कोसळून चार शेतकऱ्यांसह पाच जण ठार झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील वरवट खंडेराव (ता. संग्रामपूर) येथील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. 


शनिवारी वरवट खंडेराव येथे श्रीकृष्ण कांशीराम ढभाळ (६९) शेतात पेरणी करत असताना वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, जस्तगाव येथील युवराज विश्वास गव्हांदे (वय ३५) यांचाही शेतात अंगावर वीज पडून मृत्यू झाला. जस्तगाव येथील शेतमजूर चंदू देवनाथ पाठक (३०), रामदास गोलखेड (वय ५०) हे दोघे वीज अंगावर पडल्याने जखमी झाले. दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यात चंद्रभान चव्हाण (३५, रा. आरंभी, ता. दिग्रस) तर दादाराव राठोड (५५, रा. मारवाडी, ता. नेर), प्रकाश मानतुटे (वय १८, रा. निंगणूर, ता. उमरखेड) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. जस्तगाव येथील अंबादास गोलखेडे  तर उमरा येथील जयराम धर्मे यांच्या शेतात वीज पडल्याने दोन बैलही ठार झाले.