आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएसए मियामी क्लबमध्ये देशाच्या पाच महिला खेळाडू; करारबद्ध झालेली खुशी डाेंगरे पहिली महाराष्ट्रीयन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती गरजेची असते. याच्या बळावरच स्वप्नपूर्ती शक्य आहे, याचा प्रत्यय औरंगाबादच्या प्रतिभावंत बास्केटबाॅलपटू खुशी डाेंगरेने नुकताच आणून दिला.एनबीएतील प्रवेशाच्या स्वप्नपूर्तीसाठीची तिची वाटचाल काैतुकास्पद ठरणारी आहे. यासाठी तिने अमेरिकेतील एनबीएच्या अकॅडमिक एएसए मियामी क्लबमध्ये प्रवेश मिळवला. या क्लबच्या माध्यमातून आता तिला आगामी चार वर्षातील प्रशिक्षणातून महिला एनबीए लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. यंदा या क्लबसाठी भारतामधील दाेन महिला बास्केटबाॅलपटू करारबद्ध झाल्या. यात उत्तर प्रदेशच्या वैदेही यादवचाही समावेश आहे. 


महाराष्ट्राकडून इतिहास रचला : खुशीने मियामी क्लबसाेबत करारबद्ध हाेऊन महाराष्ट्र बास्केटबाॅलमध्ये इतिहास रचला. एनबीएच्या तयारीसाठी एखाद्या विदेशी क्लबसाेबत करारबद्ध हाेणारी खुशी ही महाराष्ट्राची पहिलीच बास्केटबाॅलपटू ठरली. आता चार वर्षांत एनबीए लीगसाठीचा आपला प्रवेश निश्चित करण्याचा तिचा मानस आहे. यासाठी प्रचंड मेहनत घेणार असल्याचेही तिने सांगितले. 


२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक : 
औरंगाबादच्या प्रतिभावंत बास्केटबाॅलपटू खुशी डाेंगरेने आपल्या चमकदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवले. त्यामुळेच तिला गत दाेन वर्षांत भारतीय युवा महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळाली. याच संधीला सार्थकी लावताना तिने एनबीए अकॅडमीकडून गतवर्षी २०१८ चा बेस्ट टीममेटचा पुरस्कारही पटकावला हाेता. तिने २०१७ मध्ये १६ वर्षांखालील महिलांच्या बास्केटबाॅल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले हाेते. डिव्हिजन बीच्या या स्पर्धेतही तिची कामगिरी काैतुकास्पद ठरली हाेती. 


खुशीला एनबीएसाठीच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह एमबीए करण्याची संधी; चार वर्षे मियामीमध्ये राहणार 
खुशीने नुकत्याच मलेशियातील युवांच्या बास्केटबाॅल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केेले. 


खुशी पाचवी खेळाडू 
यंदाच्या एनबीएच्या अकॅडमिक क्लबकडून अायाेजित शिबिरातून प्रतिभावंत महिला बास्केटबाॅलपटूंची निवड करण्यात आली. यामध्ये यंदा भारतामधील दाेन महिला खेळाडूंचा समावेश आहे. यात महाराष्ट्राची खुशी डाेंगरे आणि उत्तर प्रदेशच्या वैदेही यादवला संधी मिळाली आहे.नाेएडातील शिबिरात खुशीची कामगिरी लक्षवेधी ठरली.यातून एएसए मियामीने तिला सहभागी केले.ती करारबद्ध पाचवी भारतीय बास्केटबाॅलपटू ठरली. यापूर्वी कविता (छत्तीसगड), संजना,सुनिष्का (कर्नाटक), वैष्णवी (उत्तर प्रदेश) सहभागी झाल्या. 
एनबीएसाठी एएसए मियामी क्लबमध्ये मिळवले स्थान; शिक्षण व प्रशिक्षणाची सुविधा क्लबकडून मिळणार 


सत्रातील कामगिरी ठरली लक्षवेधी : केव्हिन 
युवा खेळाडू खुशी डाेंगरेची यंदाच्या अकॅडमी सत्रातील कामगिरी काैतुकास्पद ठरली आहे. तिने सातत्याने आपल्यातील क्षमताही एबीएच्या विविध स्पर्धांमधून दाखवून दिले आहे. त्यामुळेच तिची आमच्या एएसए मियामी महिला संघासाठी अाम्ही निवड करण्याचा निर्णय घेतला. तिच्यातल्या प्रतिभेचा आमच्या टीमला माेठा फायदा हाेईल. तसेच तिच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहाेत, अशी प्रतिक्रिया एएसए मियामी महिला बास्केटबाॅल टीमचे प्रशिक्षक केव्हिन जाॅन्सन यांनी दिली. 


डब्ल्यू एनबीए लीगसाठी ट्रायल देणार 
औरंगाबादच्या खुशीला आता महिलांच्या एनबीए लीगमधील सहभागाची माेठी संधी आहे. ही खडतर वाट आहे. मात्र, यासाठी एएसए मियामी क्लबकडून तिला आगामी चार वर्षे तंत्रशुद्ध असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून तिला एनबीएसाठी क्वालिफाय करण्याचा या क्लबचा प्रयत्न असेल. यादरम्यान तिला प्रशिक्षणासह एनबीएच्या काही परीक्षाही द्याव्या लागणार आहेत. या अव्वल कामगिरीच्या बळावर तिला महिला एनबीए लीग खेळता येईल. 
 

बातम्या आणखी आहेत...