आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावेरात पाच जुगाऱ्यांना अटक, एक जण पसार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रावेर - तालुक्यातील निरूळ येथील आशापुरी माता मंदिराच्या मागील भागात नाल्यामध्ये सुरू असलेला जुगार अड्डा रावेर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी पाच जुगारींना अटक करत त्यांच्याकडून ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, जुगार अड्डा चालवणारा पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार होण्यात यशस्वी झाला. रावेर शहरातील सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. 

 

निरुळ गावात मंदिरामागील नाल्यात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामदास वानखेडे, उपनिरीक्षक मनोहर जाधव, हवालदार जितू पाटील, हरी पाटील, भरत सोपे, जाकीर पिंजारी, नीलेश चौधरी, ओमप्रकाश सोनी, सुरेश मेढे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत समाधान फकीरचंद खैरे, महेंद्र किसन पाटील, जगन्नाथ धनसिंग चौधरी, दगडू आत्माराम पाटील, वसंत बाबुराव पाटील (सर्व रा.निरुळ) यांना अटक करण्यात आली. तर जुगार अड्डा चालक दिलीप शंकर पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. 

 

यावलमध्ये तिघांना पकडले, तीन पसार 
किनगाव (ता.यावल) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर तीन जण पसार झाले. सोमवारी सायंकाळी फैजपूर डीवायएसपींच्या पथकाने ही कारवाई करत ४६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.किनगावातील लेंडी नाल्याच्या काठावर तडवी वाड्याजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांना मिळाली. त्यानुसार यावलचे सहायक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, सहायक फौजदार अजीज शेख, हवालदार राजेंद्र पाटील, संजीव चौधरी, अविनाश चौधरी, शेख असलम, गणेश मनुरे, विकास सोनवणे, सुशील घुगे, दिलीप तायडे यांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकला. त्यांना ६ जण जुगार खेळतांना आढळले. त्यातील खलील सिराज तडवी, साहेबराव आधार महाजन व अजय साहेबराव कोळी यांना पकडण्यात आले. तर गणेश दिलीप साळुंके, सुरेश हरचंद भोई व जयवंत उर्फ बाळासाहेब रामचंद्र पाटील (रा.डोणगाव) हे तिघे पसार झाले. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला. 

बातम्या आणखी आहेत...