आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Members Of A Family Commit Suicide In Gorakhpur, Suicide In Suspicious Condition Up Gorakhpur News

ट्रॅकवर आढळलेल्या मृतदेहाची माहिती देण्यासाठी घरी पोहोचले पोलिस, तेथे आधीपासूनच होती गर्दी; घरातील दृश्य पाहून पोलिसही गेले हादरून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर - शहरातील एका व्यापाऱ्याने रविवारी ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ओळख पटवली आणि याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी घर गाठले. जेव्हा पोलिस मृताच्या घरी पोहोचले तेव्हा तेथे आधीपासूनच लोकांची भलीमोठी गर्दी जमलेली होती. गर्दी पाहून पोलिसांना आश्चर्यही वाटले, त्यांनी घरात प्रवेश करताच समोरचे दृश्य पाहून पोलिसही हादरून गेले. घरात व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तिघांचे मृतदेह पडलेले होते, तर एका मुलीची प्रकृती गंभीरी होती. या पूर्ण घटनाक्रमाचे जे सत्य समोर आले त्यामुळे सुसाइड केस मानत असलेल्या पोलिसांचा तपास पूर्णपणे बदलला. 

 

रेल्वे ट्रॅकवर आढळला पहिला मृतदेह
- एसएसपी डॉक्टर सुनील कुमार गुप्ता म्हणाले की, राजघाट परिसरातील हसनगंज परिसरातील रहिवासी 50 वर्षीय रमेश गुप्ता तूप आणि तेलाचा व्यवसाय करायचे. रविवारी सूरजकुंड रेल्वे क्रॉसिंगजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता.
- व्यापारी रमेशच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांना घराबाहेर गर्दी दिसली. पोलिसांनी लोकांना कारण विचारले, मग रूममधील दृश्य पाहताच हादरले.
- घरात तीन मृतदेह पडलेले होते. पहिला मृतदेह रमेशची 45 वर्षीय पत्नी सरोज, दुसरा 15 वर्षीय मुलगी पायल आणि तिसरा मृतदेह 10 वर्षीय मुलगा रतनचा होता. तर मोठी 20 वर्षीय मुलगी लव्हली बेशुद्ध पडलेली होती. तिला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

 

काय झाले नेमके?
- मृत व्यापाऱ्याचा पुतण्या महेंद्रने सांगितले की, सकाळी 8.00 ते 8.30 वाजेदरम्यान रमेश गुप्ता घरातून निघाले होते. 9 वाजता माहिती मिळाली की, त्यांना रेल्वेची धडक बसली आहे, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
- यादरम्यान घरात मृत रमेशची मोठी मुलगी लव्हली खिडकीतून ओरडत होती, तिचा आवाज ऐकून कुटुंबीय रमेशच्या खोलीकडे धावले तेव्हा ती बेशुद्ध पडलेली दिसली.
- कुटुंबीयांनी दार उघडले तेव्हा मृत रमेशची पत्नी, मुलगा आणि एक मुलगी मृतावस्थेत बेडवर पडलेले दिसले. मोठी मुलगी लव्हलीला गंभीर अवस्थेत बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले, जेथे तिचा मृत्यू झाला.
- एसएसपी गुप्ता म्हणाले की, पोलिस मृत रमेशच्या मृत्यूची चौकशी आत्महत्या मानत होते. परंतु जेव्हा घरी पोहोचले तेव्हा कळले की, हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण आहे. रमेशने आधी कुटुंबातील 4 जणांना विष दिले, मग रेल्वे ट्रॅकवर जाऊन आत्महत्या केली.
- ते म्हणाले की, कुटुंब छोट्या घरात राहत होते. प्राथमिकदृष्ट्या त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे दिसत आहे. मानसिकरीत्या ते खूप त्रस्तही होते, यामुळेच त्यांनी असे पाऊल उचलले.

 

व्यापारी का होता त्रस्त?
- रमेश गुप्ता यांचे नवीन गल्ला मंडईत विष्णू ट्रेडर्स नावाची किराणा दुकान होती, यात ते व्यापाऱ्यांकडून उधार माल घेऊन व्यापार करायचे, परंतु व्यापारात सतत नुकसान होत होते.
- पोलिस चौकशीत समोर आले की, त्यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले होते. व्यापारी पैसे परत करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होते. अनेक सावकार त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते, यामुळे मागच्या काही दिवसांपासून खूप त्रस्त दिसून येत होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...