Home | Maharashtra | North Maharashtra | Dhule | Five mobile lapses in half an hour

अर्ध्या तासात पाच मोबाइल लंपास

प्रतिनिधी | Update - Dec 20, 2018, 12:51 PM IST

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात घडलेला प्रकार

  • Five mobile lapses in half an hour

    धुळे : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून बुधवारी सायंकाळी अर्ध्या तासात चोरट्यांनी पाच प्रवाशांचे मोबाइल लांबवले. या घटनेनंतर प्रवाशांनी बसस्थानकातील पोलिस चौकीत तक्रार केली. उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

    शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात चोऱ्या वाढल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलिस चौकी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचारी थांबत नसल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने दिले होते. त्यानंतर आता कर्मचारी चौकीत दिसून येतात. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पॅनलही सुरू करण्यात आले आहे. त्यानंतरही बसस्थानकात चोरीचे प्रकार सुरू आहे. बसस्थानकात बुधवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे ते ५ वाजून ५० मिनिटे या कालावधीत पाच वेगवेगळ्या बसमधून पाच प्रवाशांचे मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लांबवले. विशेष म्हणजे बसमध्ये चढताना व उतरताना मोबाइल लांबवण्यात आले. त्यातील एक प्रवासी शिरपूरहून मालेगावकडे जात होता. तो एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये चढण्याच्या धावपळीत असताना चोरट्याने त्याचा मोबाइल लांबवला. दुसरा प्रवासी मालेगावकडे जात होता. तिसऱ्या प्रवाशाचा मोबाइल चोपड्याहून आलेल्या बसमधून उतरत असताना लांबवण्यात आला. चौथा प्रवासी नाशिककडे जाण्यासाठी बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी त्याचाही मोबाइल लांबवला. चौघे प्रवासी पोलिसांकडे तक्रार करत असतानाच म्हसदीहून आलेल्या बसमधून एका महाविद्यालयीन तरुणाचा मोबाइल चोरीस गेला.


    फुटेज पाहण्यास गेले पण...
    पाचही जणांनी पोलिस चौकीत कार्यरत पोलिसांकडे कैफियत मांडली. त्यानंतर सीसीटीव्ही कक्षात सर्व जण गेले. मात्र, फुटेज दाखवण्यासाठी कुणीही नव्हते.

Trending