रात्री पतीसोबत एकाच / रात्री पतीसोबत एकाच खोलीत झोपली होती 5 महिन्यांची गर्भवती, सकाळीच झाली बेपत्ता; 5 दिवसांनंतर अशा अवस्थेत सापडला मृतदेह

Nov 08,2018 12:03:00 AM IST

कुरुक्षेत्र - गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृतदेह सापडला आहे. एका कालव्यातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता तिचे नाव सोनिया असून ती गावातच राहत होती असे कळाले आहे. मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, सोनियाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून सविस्तर तपास सुरू आहे.


दोन नोव्हेंबरपासून होती बेपत्ता...
पीडित महिलेचे नाव सोनिया (23) असून ती ठसका मीरांजी गावात राहणाऱ्या सुभाषची पत्नी होती. बेपत्ता होण्याच्या पूर्वसंध्येला ती आपल्या पतीसोबत होती. दोघे एकाच रुममध्ये झोपले होते. परंतु, सकाळी ती घरात दिसलीच नाही. सुरुवातीला कुटुंबियांना ती जवळपास कुठे तरी गेली असावी असे वाटले. परंतु, दुपारपर्यंत तिचा पत्ता लागला नाही. यानंतर कुटुंबियांनी शोध सुरू केला. काही हाती लागत नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांना मंगळवारी संध्याकाळी सोनियाचा मृतदेह गावातच असलेल्या एका कॅनलमध्ये सापडला.


सीसीटीव्हीत एकटीच दिसली सोनिया
गेल्या 5 दिवसांपासून पोलिस आणि कुटुंबीय तिचा शोध घेत होते. पंचायतीने लावलेल्या सीसीटीव्हीत ती दिसून आली. 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ती एकटीच आपल्या घरातून बाहेर पडताना दिसून आली. त्याचवेळी अचानक एक बाइक आली. त्या बाइकच्या हेडलाइटने ती लपून बसली. बाइक गेल्यानंतर पुन्हा उठली आणि ब्रिजच्या दिशेने निघून गेली. कालव्याच्या किनाऱ्यावर तिची चप्पल आणि ओढणी सापडले. यानंतर स्थानिकांना कॅनलमध्ये तिचा मृतदेह दिसून आला.


दीड वर्षांपूर्वीच झाला होता विवाह
सोनियाचा विवाह फेब्रुवारी 2017 मध्ये सुभाषचंद्र नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता. ती दहावीपर्यंत शिकलेली होती. लग्नानंतर पतीने तिला आणखी शिकवण्याची इच्छा व्यक्त केली. ती आपल्या पतीसोबत खुश होती. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, बेपत्ता झाली तेव्हा ती 5 महिन्यांची गर्भवती होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना तिचा असा मृत्यू झालाच कसा असा प्रश्न पतीला पडला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी सुद्धा तिच्या पती किंवा सासरच्या मंडळीवर कुठल्याही प्रकारचा आरोप लावलेला नाही. पोलिस आता तिच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

X