आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका खूनचा बदला घेण्यासाठी ऑन द स्पॉट केले चार मर्डर, मुलाच्या मृत्यूने संतप्त बापाने सर्वांना कुऱ्हाडीने कापले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपूर (राजस्थान) - मारहाणीची केस दाखल करण्याची धमकी देण्यासाठी गेलेल्या सरपंच पती विक्रमचा पाती रामने गोळ्या झाडून खून केल्याची घटना गुरूवारी मियापूरा गावात घडली. घटनास्थळीच विक्रमचा मृत्यू झाला. यानंतर संतापलेले संरपंच पक्षाचे लोक लाठ्या-काठ्या घेऊन हल्लेखोराच्या पक्षातील लोकांवर तुटून पडले. यावेळी झालेल्या हाणामारीत चार लोकांचा मृत्यू झाला. दोघांनी घटनास्थळीच प्रोण सोडले तर दोन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 9 लोक जखमी झाले. यानंतर जिव वाचवण्यासाठी लोक शेतात जाऊन लपले.


पोलिस पोहोचले तेव्हा जागो-जागी लोकांच्या किंचाळ्या...
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व जखमींना सुरक्षीत हॉस्पिटलमध्ये पोहेचवले. घटनेचे गांभीर्य एवढे होते की, पोलिसांना जागोजागी लोक किंचाळतांना दिसत होते. 
- पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात गुरूवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याच पक्षाने तक्रार दिली नव्हती. पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
- गावकऱ्यांनी सांगितले की, माजी आमदार शिवराम कुशवाह आणि भांडणारे दोन्ही पक्ष एकाच कुटुंबातील आहे. ते याच गावात राहतात. परंतु, त्यांच्या बोलणे बंद होते.


असा होता घटनाक्रम...
- दोन दिवसांपूर्वी मिया पुरा गावात रामस्वरूप आपल्या एका नातेवाईकासोबत दारू पित होता. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर भांगणात झाले. 
- दरम्यान, सरपंच पती विक्रमचा नातेवाईक वीरेंद्र देखील दारूच्या नशेत तिथे पोहोचला. त्याने रामस्वरूप आणि त्याच्या नातेवाईकात सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. रामस्वरूपने त्याला मध्ये न पडण्यास सांगितले. यावरूनच दोघांमध्ये हाणामारी झाली. विरेंद्रने दांडा मारल्याने रामस्वरूपचा हात तुटला.
- या घटनेची माहिती वीरेंद्रच्या घरच्यांना कळाली तेव्हा त्यांनी रामस्वरूपला मारहाण केली. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी रामस्वरूपकडून पोलिस ठाण्यात वीरेंद्रविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. 
- याचा विरोधा करणारे सरपंच पक्षाचे लोक माजी आमदाराकडे गेले होते. ते विरोध करत होते, तेवढ्यात पाती राम नावाच्या तरूणाने सरपंच पती विक्रमवर गोळी झाडली.
- विक्रमच्या खूनाने संतप्त लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी पातीरामला मारहाण करून त्याचा खून केला.
 

मुलाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या बापाने केला कहर...
विक्रमच्या मृत्यूमुळे संतापलेले त्याचे वडील रामरतन यांनी आपल्या अन्य दोन मुलांसोबत जाऊन रामस्वरूप आणि त्याच्या पक्षाच्या लोकांनावर कुऱ्हाडीने हल्ला केला. पाहता-पाहता त्यांनी दोन लोकांना मारून टाकले. इतर लोकांना देखील पळवून पळवून मारले. गावकऱ्यांनी सांगितले की, रामरतन कुऱ्हाडी चालवण्यात एक्पर्ट आहे. त्यामुळे त्याने पाहता पाहता सर्वांना कापून टाकले.

 

बातम्या आणखी आहेत...