आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीच्या टीममध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू, भारताच्या एकमेव पूनमची निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगकडे आयसीसीच्या टीमचे नेतृत्व, इंग्लंडच्या ४ खेळाडूंची निवड
  • शेफाली वर्मा संघात १२ वी खेळाडू, अाफ्रिकेच्या लाऊराही प्लेइंग ११ मध्ये

दुबई - यंदाच्या टी-२० विश्वचषकामध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची  आयसीसीने आपल्या वर्ल्डकप टीममध्ये निवड केली. आयसीसीच्या या वर्ल्डकप  टीममध्ये विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या सर्वाधिक पाच  महिला खेळाडूंचा समावेश आहे. विश्वचषकाची पहिल्यांदाच फायनल गाठणारा भारतीय संघ उपविजेता ठरला. या संघातील एका खेळाडूला वर्ल्डकप टीममधील स्थान निश्चित करता आले.  गाेलंदाजीने आपले वर्चस्व राखणाऱ्या पूनम यादवचा या संघात समावेश आहे. दुसरीकडे भारताची १५ वर्षीय गुणवंत फलंदाज शेफाली वर्माची १२ वा खेळाडू म्हणून संघात निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लेनिंगकडे या वर्ल्डकप संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली. तिच्या नेतृत्वात तीन वेळा ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० मध्ये विश्वविजेता ठरला. त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी करणारी ती जगातील एकमेव कर्णधार आहे. त्यामुळेच आपल्या कुशल नेतृत्वात हे विक्रमी यश संपादन करणाऱ्या लेनिंगकडे आयसीसीने कर्णधारपद साेपवल्याची घाेषणा केली. या संघामध्ये इंग्लंडच्या चार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.तिन्ही फाॅरमॅटमध्ये शतक साजरे करणारी नाइट एकमेव 

मधल्या फळीत  हिथर नाइट आणि नतालिया सिवरची निवड झाली आहे.  यादरम्यान विश्वचषकातील अव्वल कामगिरीमुळे हिथरची निवड झाली. तिने थायलंडविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये शतक साजरे केले. यातून आता तिच्या नावे   क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये  (कसाेटी, वनडे आणि टी-२०) शतक साजरे करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. 

टी-२० : शेफालीला मागे टाकत बेथ मुनी अव्वल स्थानावर


भारताच्या युवा फलंदाज शेफाली वर्मासाठी नंबर वनचे स्थान आैटघटकेचे ठरले. तिने फायनलमध्ये अवघ्या दाेन धावांची खेळी केली. त्यामुळे तिची अव्वल स्थानावरून घसरण झाली. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने अर्धशतकी खेळीसह संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. यासह तिने क्रमवारीत प्रगती साधली. तिने ७६२ गुणांसह शेफालीला मागे टाकत अव्वल स्थानावर धडक मारली. गावसकरांच्या मते : गुणवंतांसाठी पुढच्या वर्षीपासून महिला आयपीएल व्हावी


नवी दिल्ली | नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-२० विश्वचषकात महिला खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. विक्रमी खेळी करताना या महिला खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. यातूनच महिला खेळाडूंमध्येही प्रचंड प्रतिभा आणि गुणवत्ता आहे. त्यामुळे आता या महिला खेळाडूंच्या गुणवत्तेचा शाेध घेण्यासाठी आणि चालना देण्यासाठी पुढच्या वर्षीपासून महिलांसाठीही खास स्वतंत्र्य आयपीएल आयाेजित करण्याचा विचार भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मांडला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता महिलांच्या क्रिकेटलाही भारतामध्ये चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. यातून भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत हाेईल.