आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात 10 वी नापास 5 जण बनले पायलट; न्यायमूर्ती म्हणाले, यांची तर बस चालविण्याचीही लायकी नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्समध्ये (पीआयएस) पाच मॅट्रिक फेल अर्थात 10 वी नापास वैमानिक आढळून आले आहेत. बनावट पदवी प्रमाणपत्र सादर करून पाच जण थेट वैमानिक बनले होते. या प्रकरणी नागरिक उड्डायन प्राधिकरणाने (सीएए) या प्रकरणी पाक सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

बनावट पदवी सादर करून 7 जण बनले वैमानिक..

न्यायमूर्ती एजाजुल अहसान यांनी या प्रकरणी सुनावणी करताना सांगितले की, मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेला व्यक्तीची बस चालविण्याचीही पात्रता नसते. परंतु, या महाभागांनी विमान उडवून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला. सुप्रीम कोर्टाने पीआयएमध्ये कार्यरत वैमानिक व इतर कर्मचार्‍यांचे पदवी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राधिकरणाने कोर्टात सांगितले की, सात वैमानिकांनी बनावट पदवीच्या आधारावर पीआयएमध्ये नोकरी मिळवली. यापैकी पाच जण असे आहेत की, त्यांनी 10 वीची परीक्षाही उत्तीर्ण केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...