Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | five-point-to-make-you-successful

पाच तत्त्वे ठरवणार तुमचे यश

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 01:09 PM IST

जीवनात काही जणांना अपेक्षेपेक्षा अधिक य़श मिळते, तर काहींना य़शस्वी होण्यासाठी आयुष्यभर झगडत राहावे लागते.

 • five-point-to-make-you-successful

  जीवनात काही जणांना अपेक्षेपेक्षा अधिक य़श मिळते, तर काहींना य़शस्वी होण्यासाठी आयुष्यभर झगडत राहावे लागते. विद्वानांना विचारायला गेलं तर याबाबत खूप वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे मिळतात. काहींच्या मते यशस्वी होण्याची अमूक कारणे असतात. तर काहींच्या मते तमूक कारणांमुळे य़शस्वी होता येते. इथे आम्ही यशस्वी होण्याची काही कारणे देत आहोत. यावर जगातील अनेक लोकांचे निश्चितपणे एकमत होऊ शकेल. यशस्वी होण्याची जी काही मूलभूत कारणे आहेत, त्याचे मूळ योग विद्येत दडलेले आहे. अष्टांग योगाच्या आठ अवस्था आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान और समाधी. ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग योगविद्या आहे. योगविद्येच्या आठ अवस्थांमधून आपण ईश्वरप्राप्तीपर्यंत पोचू शकतो. ईश्वरप्राप्तीबरोबरच संसारातील कोणतेही मोठ्यात मोठं यश मिळवायचे असेल, तरीही योग विद्येचा उपयोग होऊ शकतो.

  अहिंसा - अहिंसेचे व्रत आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकते. समाजामध्ये आपल्याला विशेष सन्मान मिळू शकतो. जी व्यक्ती अहिंसेचे पालन करते त्याच्या विरोधातील लोकही त्याला विरोध करू शकत नाहीत.

  सत्य - कोणाला तरी धोका देण्यासाठी किंवा कपटीपणाने कोणतीही गोष्ट करू नये. जी गोष्ट जशी आहे. त्याच पद्धतीने ती इतरांपर्यंत पोचविली गेली पाहिजे.

  अस्तेय - चोरी करून किंवा एखाद्याला धोका देऊन त्याचे धन किंवा इतर वस्तू लुटणे अपराध आहे. कोणत्याही स्थितीत चोरी करण्याचा विचारही करू नये.

  ब्रह्मचर्य - याचा अर्थ आहे इंद्रियांचा संयम. आपले भोजन, व्यवहार, विचार सर्वकाही सारासार असले पाहिजे. जी व्यक्ती संयमी राहू शकत नाही, ती मानसिक बळ हरवून बसते आणि तिच्यात आत्मविश्वासही उरत नाही.

  अपरिग्रह - याचा अर्थ गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह करू नये. बाहेरच्या दिखाऊपणापासून एखाद्याचे मन विचलित झाल्यानंतरच त्याच्या यशाबद्दल बोलता येईल. शांततेचा अर्थ सुखी-संतुष्ट राहणे असा आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा तणाव असता कामा नये. मनात आणि आजूबाजूच्या वातावरणात शांतता असल्यानंतर आपण योग साधनेच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोचू शकतो.

Trending