आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Terror Alert: भारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या आयएसआय एजंटसह चार दहशतवाद्यांनी भारतात घुसकोरी केल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे राजस्थान आणि गुजरात सीमेसह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  हे पाचही दहशतवादी अफगानी पासपोर्टच्या मदतीने भारतात घुसल्याची माहिती आहे. यामुळे गुजरात राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान गुजरात एटीएसने दहशतवाद्याचे स्केच तयार करून ते पोलिस अधिकारी, तपास यंत्रणांना पाठवले आहे.  हे चार दहशतवादी एका एजंटसह भारतीय हद्दीत घुसले आहेत. तसेच कोणत्याही या दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्यात येऊ शकतो अशी माहिती सिरोही, राजस्थानच्या पोलिस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिली. याबाबत राजस्थानच्या पोलिस स्टेशन हद्दीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.    दरम्यान गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणे, ढाबा, रेल्वे स्टेशन, बस आणि हॉटेल्सची तपासणी केली जात आहे. तसेच वाहनांची तपासणी देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.