आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Encounter: काश्मीरच्या कुलगाव येथे जोरदार चकमक; 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, इंटरनेट सेवा बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात देवसर परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक उडाली. या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. देवसर परिसरात काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिस आणि सैनिकांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे रविवारी सकाळी शोध मोहिम राबवण्यात आली. या दरम्यान जवानांवर गोळीबार झाला असता त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आणि चकमक उडाली. यात दुपारी 1 वाजेपर्यंत कारवाईला यश आले.

 

इंटरनेट सेवा तात्पुरती बंद
या चकमकीनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या ऑपरेशनमध्ये राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांचा समावेश होता. राज्यात 2017 पासून ऑपरेशन ऑल आउट सुरू आहे. या मोहिमेत बारामुला पूर्णपणे दहशतवादमुक्त घोषित करण्यात आला होता. गेल्या चार वर्षांत 2018 मध्ये सर्वाधिक 257 दहशतवादी मारले गेले. सुरक्षा रक्षकांनी 2017 मध्ये 213, 2016 मध्ये 150 आणि 2015 मध्ये 108 दहशतवादी मारले होते. 2018 फक्त 31 ऑगस्ट पर्यंत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा 142 पर्यंत पोहोचला होता. ऑगस्ट 2018 मध्ये सर्वाधिक 25 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एका अधिकृत आकडेवारीनुसार, काश्मीरात अजुनही 300 दहशतवादी सक्रीय आहेत.

बातम्या आणखी आहेत...