आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, यारवान जंगलात दहशतवादविरोधी मोहिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शोपिया जिल्ह्यातील यारवान जंगलात गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यारवानतच्या जंगलांमध्ये दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी मोहिम राबवण्यात आली आणि 5 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. घटनास्थळी आणखी काही दहशतवादी लपले असून ही चकमक सुरूच आहे.

 

दहशतवादविरोधी कारवाईत ठार झालेले सर्व 5 दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिद्दीनचे सदस्य होते. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी बुधवारी रात्रीच शोपिया जिल्ह्यात शोध मोहिम सुरू केली. रात्री आणि सकाळी झालेल्या चकमकीनंतर सुरुवातीला 2 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत आणखी 3 मृतदेह सापडले.

बातम्या आणखी आहेत...