आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत दिसण्यासाठी आपल्या मित्रांना घरासमोर गाड्या उभ्या करायला लावायचे बीग बी, आयुष्यात या संघर्षांचा केला सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. महानायक अमिताभ बच्चन यांच्या ब-याच गोष्टी सर्वांनाच माहिती आहे. पण खरे अमिताभ कसे आहेत हे कुणालाही माहित नाही. त्यांचा स्वभाव खुप वेगळा होता. ते कधी रागिट होते तर कधी ते मोजक्या शब्दात बोलायचे. आज ते सर्वात यशस्वी, सर्वांचे आवडते, विनम्र वयस्करांप्रमाणे शानमध्ये राहणा-या कलाकाराप्रमाणे आहेत. ते आपल्याला चॉकलेट, कोल्ड ड्रिंक, च्यवनप्राश, केश तेल, सूट किंवा भिंतींवर लावण्यात येणा-या पेंटच्या जाहिराती करताना दिसतात. आजही ते चित्रपटांमध्ये तितकेच सक्रियही आहेत. पण पहिले असे नव्हते. अमिताभ बच्चन स्वतःला श्रीमंत दाखवण्यासाठी मित्रांना त्यांच्या घरासमोर गाड्या उभ्या करण्यास सांगायचे. 


अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 27 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांना त्यांच्या वयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. कधी त्यांचे आयुष्य पणाला लागले तर कधी संपत्ती, परंतु ते जेवढ्या वेळा कोसळले, तेवढ्या वेळा ते नव्या ताकदीने उभे राहिले. आज बिग बींचे देशात आणि जगात कोट्यावधी चाहते आहेत. 


दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ म्हणाले होते की, मी आतल्या आत घुटमळत होतो. मी जेव्हा माझा सुर्य चमकताना पाहिला तेव्हा त्याच्या प्रकाशात आपले काम रोज प्रमाणे राहू देण्याचा संकल्प केला. कारण मला माहिती होते की, सुर्य उगवल्यानंतर संध्याकाळ येतेच आणि नंतर घनदाट काळोख पडतो. यामुळे मी विचलित झालो नाही. रात्र विचार करण्यात जात होती. त्या स्थितीमध्येही संयम ठेवला. एक डोळ्यांसमोरचा शून्य अनेक दिवस मला घाबरवत होता. मित्रांनी सल्ला दिला की, मोठे-मोठे श्रीमंतही अशा परिस्थिती स्वतःला दिवाळखोर घोषित करतात आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतात. मग तु असे का करु शकत नाही? पण माझी आत्मा असे करण्यास परवाणगी देत नाही. मी या परिस्थितीमध्येही थोडे कर्ज घेतले आणि कुटूंबाच्या गरजा पुर्ण केल्या. पण या गोष्टींची चाहूल घरच्या लोकांना लागू दिली नाही. मीडियाचे लोक माझे घर निलाम होण्याचे वृत्त मिळाल्यानंतर कॅमेरा घेऊन घराबाहेर आले. मी नकार दिल्यावर लोक म्हणाले की, तुम्ही फोटो घेऊ दिला नाही तर आम्ही बाजूच्या छतावरुन फोटो घेऊ. मी माझ्या घराच्या आजुबाजूला अजून काम करुन घेतले. मेन गेट बदलले आणि मित्रांना सांगितले की, तुमच्या गाड्या माझ्या पोर्टिकोमध्ये पार्क करत जा. मग लोकांना वाटेल की, माझ्याकडे पहिल्या प्रमाणेच गाड्या आहेत. आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या कमबॅकचे असेच 5 किस्से सांगणार आहोत. 


1) करिअरच्या सुरवातील कमालीचा संघर्ष... 
अमिताभ बच्चन यांची उंची जास्त असल्याने चित्रपटात रोल मिळविताना त्यांना बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांना कसाबसा "सात हिन्दुस्तानी" हा चित्रपट मिळाला. परंतु, हा त्यांच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपटांपैकी तो एक ठरला. "रेशमा और शेरा" यात त्यांनी मुक्या व्यक्तीची भूमिका वठविली. परंतु, यातही त्यांना यश मिळाले नाही. "आनंद" या चित्रपटात त्यांनी अभिनयाची छाप सोडली. परंतु, त्यानंतर अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांना चित्रपट देण्यात दिग्दर्शक राजी होत नव्हते. हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय वाईट कालावधी होता. त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवसांमध्ये प्रकाश मेहरा "जंजीर" या चित्रपटाचे कास्टिंग करीत होते. या चित्रपटासाठी ते नायकाचा शोध घेत होते. एक दिवस ते प्राण यांच्यासोबच कॅबिनमध्ये चर्चा करीत होते. यावेळी प्राण यांनी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचविले. परंतु, प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना लीड रोड देण्यास नकार दिला.
अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट बघून प्रकाश मेहरा यांनी आपले मत तयार करावे, असे प्राण यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर मेहरा यांनी अमिताभ यांना लीड रोल दिला. या चित्रपटाचे संवाद सलीम-जावेद यांनी लिहिले होते. ही तेव्हाची हिट जोडी होती. तरीही चित्रपटाच्या वितरकांनी चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स दिला नाही. त्यांच्यासाठी अमिताभ एक फ्लॉप चित्रपट देणारे हिरो होते. परंतु, जेव्हा हा चित्रपट पडद्यावर आला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. जबरदस्त अॅक्टिंग आणि डॉयलॉगच्या बळावर.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा असेच काही किस्से...

 

बातम्या आणखी आहेत...