Home | Jeevan Mantra | Dharm | Five Tips For Temple In Hom

देवघरात चुकूनही ठेवू नयेत या 5 वस्तू, अन्यथा घडू शकते काही अशुभ

रिलिजन डेस्क | Update - Aug 23, 2018, 12:02 AM IST

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे शुभ योग आहेत परंतु घरामध्ये वास्तुदोष किंवा इतर दोष असल्यास जीवनात अडचणी कायम र

 • Five Tips For Temple In Hom

  एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे शुभ योग आहेत परंतु घरामध्ये वास्तुदोष किंवा इतर दोष असल्यास जीवनात अडचणी कायम राहतात. घरातील दोषामुळे कुंडलीतील शुभ योगाचा प्रभाव कमी होऊ शकतो. देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात देवघर अवश्य बनवले जाते. काही गोष्टी अशा असतात, ज्या देवघरात चुकूनही ठेवू नयेत. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार देवघरात वर्ज्य सांगण्यात आलेल्या वस्तू ठेवल्याने व्यक्तीचे दर्भाग्य कधीही पाठ सोडत नाही. येथे जाणून घ्या, देवघरात कोणकोणत्या गोष्टी ठेवू नयेत.


  > देवघरात मृत व्यक्तीचे फोटो लावू नयेत. मृत व्यक्तीचा फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम राहते. देवघरात देवासोबत असे फोटो लावल्याने दुर्भाग्य वाढू शकते.


  > देवघरात खंडित मूर्ती ठेवू नयेत. तुमच्या घरामध्ये देवाची एखादी खंडित मूर्ती असल्यास ती लगेच घरातून काढून टाका. खंडित मूर्तीची पूजा केल्यास पूर्ण फळ प्राप्त होत नाही.


  > देवघरात सुकलेली फुले ठेवू नयेत. यामुळे अस्वच्छता आणि वास्तूदोष वाढतात. यामुळे सकाळी अर्पण केलेली फुले रात्री काढून टाकावीत.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

 • Five Tips For Temple In Hom

  > तुम्हाला देवघरात शिवलिंग ठेवण्याची इच्छा असल्यास अत्यंत छोटे शिवलिंग ठेवावे. जास्त मोठे शिवलिंग घरात ठेवू नये.

 • Five Tips For Temple In Hom

  > एकाच देवी-देवतांच्या खूप जास्त मूर्ती देवघरात ठेवू नयेत. फक्त श्रीगणेशाच्या सम संख्येतील मूर्ती ठेवू शकता. सम संख्या म्हणजे 2, 4, 6 इत्यादी.

Trending