आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Year And Eight Year Old Two Brother Killed There 5 Year Old Friend With Screwdriver After Dispute Over Mango, Then Threw Him In Lake

क्षुल्लक कारणावरून 5 आणि 8 वर्षीय भावंडांनी स्क्रू ड्रायव्हरने फोडले 6 वर्षीय मित्राचे दोन्ही डोळे, जीव गेल्यावर तलावात फेकून झाले पसार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डभरा(छत्तीसगड)- 5 आणि 8 वर्षांच्या भावंडानी आपल्या 6 वर्षीय मित्र साहिल दासचे स्क्रु-ड्रायव्हरने दोन्ही डोळे फोडले आणि नंतर त्याला तलावात फेकून दिल्याची घटना घडली आहे. पाण्यात फेकल्यानंतर साहिलचा मृत्यू झाला. घटना जांजगीर चांपा जिल्ह्यातील डभरा बगरैल गावाची आहे. घटना रविवारी घडली आणि घटनेदरम्यान त्यांचे आणखी तीन मित्र उपस्थित होते.

 


मित्रांसोबत खेळायला गेला होता साहिल, परत आल्यावर चोराने उचलून नेले असे सांगितले
बाहेर खेळण्यासाठी ही सगळी मुले गेली. काही वेळानंतर सगळे मुळे पर आले, पण साहिल आलाच नाही. बराचवेळ होऊनही साहिली घरी परतला नसल्याने त्याच्या आजोबांनी मित्रांकडे विचारपुस केली. त्याच्या मित्रांनी साहिलला चोराने नेल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. काही वेळानंतर त्यांना साहिलचा मृतदेह गावातील तलावात मिळाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली.


साहिलने आंबा खाल्यामुळे भांडण झाले
जांजगीरच्या एसपी पारुल यांनी सांगितले की, "डभरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या बगरैल गावात रविवारी साहिल दास आपल्या 5 मित्रांसोबत खेळायला गेला. काही वेळ खेळल्यानंतर त्यांचा आंबे खाण्याचा प्लॅन ठरला. त्यांच्यातला एकजण आंब्याच्या झाडावर चढला आणि एक-एक आंबा खाली टाकू लागला. साहिलने त्यातले आंबे खाल्ले त्यामुळे तो नाराज झाला. त्यानंतर त्या दोघात आंब्यामुळे वाद झाला. वाद वाढून त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. साहिलच्या खिशात एक स्क्रू ड्रायव्हर होते, त्याच्या मित्राने ते हिसकाऊन घेतले आणि साहिलच्या डोळ्यात मारले. एक-एक वार करत त्याने साहिलचे दोन्ही डोळे फोडले. यादरम्यान काही वार साहिलच्या डोक्यातही झाले.  त्यानंतर साहिलच्या शरिरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर 5 वर्षीय आणि 8 वर्षीय दोन्ही भावांनी त्याला जवळच्या तलावात फेकले. या दरम्यान घाबरलेली इतर मुले फक्त पाहण्याशिवाय काहीच करू शकले नाही."