आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मूकबधिर मुलीचा िवनयभंग करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मोहन गाेविंद धनगुडे (बालमटाकळी, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १६ जानेवारी २०१७ रोजी घडली होती. ही मुलगी घरासमोर वासरू बांधत असताना आरोपीने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. 


उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. मुलीचे आई-वडील ऊसतोड कामगार असून आजोबा वयस्कर आहेत. पीडितेला एेकू येत नाही, बोलताही येत नसल्याचे माहिती असल्याने आरोपीने गैरफायदा उठवला, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे अॅड. मंगेश दिवाणे यांनी केला. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीस दोषी ठरवत त्याला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...