आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 वर्षांच्या मुलाने केला असा पराक्रम, बक्षिसात मिळाली चक्क Mercedes कार; जाणून घ्या कसे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - मर्सेडीज कार अनेकांची ड्रीम कार असते. अशात ही कार बक्षीस म्हणून मिळत असेल तर... रशियात अवघ्या 5 वर्षांच्या मुलासोबत असेच काही घडले. रकीम कुरायेव्ह असे या मुलाचे नाव असून त्याने 2 तास 25 मिनिटांत अनोखा पराक्रम केल्याने त्याला मर्सेडीज मिळाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्ती लेफ्टनंट रमजान कद्रोव यांनी रकीमला पांढरी मर्सेडीज बक्षीस स्वरुपात दिली. 

 

2 तास 25 मिनिटांत लावले तब्बल 4,105 पुश-अप्स

रकीम हा पुश अप्स करण्यात तरबेज आहे. त्याने 2 तास 25 मिनिटांत सलग 4,105 पुश-अप्स केले. त्यावर आनंदी होऊन रशियाचे लेफ्टनंट रमजान कद्रोव यांनी रकीमला नवी-कोरी पांढरी मर्सेडीज गिफ्ट केली आहे.

 

रकीमला रशियन अधिकाऱ्याने सर्वप्रथम एका व्हिडिओमध्ये पाहिले होते. मुलाला पाहताच ते खुश झाले. परंतु, व्हिडिओचा दर्जा चांगला नसल्याने त्यांना काहीसा संशय देखील आला. यानंतर त्यांनी स्वतः जाऊन रकीमची भेट घेतली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाने खरोखर हा पराक्रम करून दाखवल्याचे पाहता रमजान इतके खुश झाले की त्यांनी मुलाला चक्क मर्सेडीज गिफ्ट केली. रशियन माध्यमांवर एका रात्रीत स्टार झालेल्या रकीमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. परंतु, त्याला खरोखर ही कार गिफ्टमध्ये मिळाली की फक्त एक राइड देण्यात आली असा प्रश्न पाश्चात्य माध्यम उपस्थित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...