Home | International | Other Country | Five year old Girl from Tel Aviv stuns Instagram with her hair and look Video

5 वर्षांच्या मुलीचा लूक पाहून क्रेझी झाले लोक, जगातील टॉप फॅशन मॅगझीनमध्ये मिळाले स्थान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 12:00 PM IST

इस्रायलची एक 5 वर्षीय चिमुरडी आपल्या लूकमुळे इंटरनेट सेंसेशन बनली आहे. तिचे फोटोज प्रसिद्ध फॅशन मॅगझिनमध्ये झळकले आहेत.

 • Five year old Girl from Tel Aviv stuns Instagram with her hair and look Video

  तेल अवीव - इस्रायलची एक 5 वर्षीय चिमुरडी आपल्या लूकमुळे इंटरनेट सेंसेशन बनली आहे. तिचे फोटोज प्रसिद्ध ब्रिटिश फॅशन मॅगझिन वोगच्या वेबसाइटवरही झळकले आहेत. पालकांनी मुलीसाठी एका हेअर स्टाइलिस्टची नेमणूकही केलेली आहे. तो तिला राइजिंग स्टार बनण्यात मदत करत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळजवळ 50,000 फॉलोअर्स झालेले आहेत. तथापि, काही सोशल मीडिया युजर्स एवढ्या कमी वयात मुलीवर असे एक्सपेरिमेंट केल्यावरून आईवडिलांवर टीका करत आहेत.

  हेअर स्टाइलिस्ट करतात सुरेख केशरचना
  - तेल अवीवची रहिवासी 5 वर्षीय मिया अफलालोच्या मॉडेलिंग फोटोजनी पूर्ण जगाला क्रेझी केले आहे. लोकं तिच्या हिरव्या डोळ्यांचे आणि दाट केसांचे कौतुक करत आहेत.
  - मियाचे इन्स्टाग्राम पेजवर तिच्या मॉडेलिंगचे अनेक फोटोज आहेत. ज्यात ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. तिचे लूक पाहून सोशल मीडियावर तिचे हजारों फॉलोअर्स झालेले आहेत.
  - इस्रायलचे हेयर स्टाइलिस्ट सगी दहारी मियाच्या हेअरस्टाइलची काळजी घेतात. सगी म्हणतात की, मियासोबत काम करणे खूप सोपे आहे. ती कोणतीही तक्रार करत नाही, विरोधही करत नाही.
  - सगी तिच्यामुळे खूप इंप्रेस आहेत आणि तिला प्रिंसेस मिया म्हणून हाक मारतात. तिच्या मते, मिया खूपच शांत बसून आपली केशरचना होण्याची वाट पाहते आणि लोकांना फक्त हसून बघते.
  - हेयर स्टाइलिस्टने इंस्टाग्रामवर मियाचा एक फोटो शेअर करत तिची तुलना अमेरिकन सिंगर जेनिफर लोपेजशी केली होती. या फोटोत मिया आपल्या डोक्याच्या टॉपवर एक पोनीटेल बांधलेली आणि हातात ड्रिंक घेतलेली आहे.

  पालकांवर टीकेची झोड
  - मियाच्या इम्प्रेसिव लूकचे एकीकडे कौतुक होत आहे. दुसरीकडे, काही सोशल मीडिया युजर्स तिच्या पालकांवर टीका करत आहेत.
  - एका फॉलोअरने लिहिले की, एवढ्या छोट्या मुलांवर असे प्रयोग करणे अतिशय लाजिरवाणे आहे. जर माझी मुलगी असती तर मी कधीही तिचे असे प्रदर्शन मांडले नसते.
  - आणखी एका फॉलोअरने लिहिले की, आपल्या मुलीचे असे जगभर प्रदर्शन मांडण्यापेक्षा तिला सुरक्षित कसे ठेवता येईल याची काळजी घ्या.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या मियाचे आणखी काही Photos...

Trending