आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाच्या अाराेपात भिकाऱ्यास पाच वर्ष सक्तमजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भीक मागण्याच्या वादातून खून करणाऱ्या भिकाऱ्याला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. शुक्रवारी (दि. २८) जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी ही शिक्षा ठोठावली. 


अभियोग कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१७ मध्ये रामकुंडावर झोपण्याच्या जागेच्या कारणावरून दोन भिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. आरोपी अनिल बाबुराव आपटे याने मद्याच्या नशेत अरुण शिवाजी भामरे यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान भामरे यांचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी आपटेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. उपनिरीक्षक पी. पी. मुंढे यांनी सबळ पुरावे गोळा केले. न्या. देशमुख यांनी फिर्यादी पोलिस कर्मचारी अशोक सोनवणे, साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे कल्पक निंबाळकर यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी एल. एल. जगताप, पी. व्ही. शिंदे, एस. आर. साळवे यांनी पाठपुरावा केला. 

बातम्या आणखी आहेत...