आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयात ध्वजारोहण : सीएम फडणवीस म्हणाले-कृषी, उद्योग, रोजगार निर्मितीत महाराष्ट्रच अव्वल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाच्या 72 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वाजारोहण करण्यात आले. यानंतर झालेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षीतील कामाचा लेखाजोखा मांडला. गेल्या चार वर्षात कृषी, उद्योग आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्रच अव्वल स्थानी राहिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
>> राज्य सरकारने विक्रमी अन्नधान्याची खरेदी केली आहे. 2014-15 मध्ये 450 कोटींची एकूण खरेदी करण्यात आली होती. त्या तुलनेत गेल्या तीन वर्षात एकूण 8 हजार कोटींची अन्नधान्याची खरेदी राज्यसरकारने केली आहे. ही शेतकऱ्यांसाठी सरकारची असलेल्या कटिबद्धता आहे. 

>> विदर्भ मराठवाड्यासारख्या भागात स्वर्गीय नानाजी देशमुख हा कृषी प्रकल्प यासह अनेक प्रकल्प शेतीचे चित्र बदलण्यासाठी सुरू करत आहोत. 

>> महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे विविध परदेशी गुंतवणूक व्हावी यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून भारताने प्रयत्न केले. त्यामुळे दोन वर्षात देशात एकूण जी गुंतवणूक झाली त्यापैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. 

>> ईपीएफओने नवीन रोजगार निर्मितीचे जे आकडे जाहीर केले आहेत, त्यामध्येही महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार निर्माण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या एका वर्षात 8 लाख रोजगार संघटित क्षेत्राच निर्माण झाले आहेत. 

>> एससी, एसटी, ओबीसींसाठी मोठ्या प्रणामावर योजना तयार केल्या आहेत. सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर देण्याच्या कल्पनेनुसार महाराष्ट्रात वेगाने काम सुरू आहे. 

>> राज्यातील सामाजिक सौहार्द टिकून राहिला तरच महाराष्ट्र पुढे जाईल. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालले तरच ते शक्य होईल. त्यामुळे महाराष्ट्र एकसंघ राहील हा संकल्प आपण स्वातंत्र्यदिनी घेऊयात. 

 

बातम्या आणखी आहेत...