आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अागीत मृत्युमुखी पडलेल्या १० खेळाडूंच्या स्मरणार्थ फ्लमेंगो क्लबने विश्वचषक फायनलमध्ये राष्ट्रगीत गायले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • फ्लमेंगो संघ गत महिन्यात काेपा लिबर्टाडाेरेस अाणि ब्राझीलच्या सिरी एचा चॅम्पियऩ

रिअो दि जानेरिअो - ही गाेष्ट अाहे ब्राझीलच्या सर्वात लाेकप्रिय फुटबाॅल क्लब फ्लमेंगाेची. दुर्दैवाने या क्लबचे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात लागलेल्या भीषण अागीत माेठे स्वप्न भस्मसात झाले अाहे. याच अागीत क्लबचे युवा १० खेळाडू ठार झाले हाेते. त्यामुळे क्लब फ्लमेंगाेवर दु:खाचा माेठा डाेंगर काेसळला हाेता. टीमला एकाच वेळी दुर्दैवाने अापले १० हुुकमी एक्के गमवावे लागले. अकादमीच्या इमारतीला लागलेल्या अागीमुळे ही विदारक घटना घडली हाेती. मात्र, त्यापेक्षाही अधिक वेदनादायक ठरले ते या प्रकरणानंतरही मालकाने जबाबदारी झटकली. त्यामुळे क्लबला दुसरा माेठा धक्का बसला. १० युवा फुटबाॅलपटूंना न्याय मिळावा यासाठी फ्लमेंगाे क्लबने माेहीम हाती घेतली. यातूनच अाता क्लब प्रत्येक सामन्याच्या वेळी या सर्व युवांच्या स्मरणार्थ रॅली काढते. 

रात्रीच्या वेळी लागली हाेती अकादमीला अाग, सीनियरचा मदतीसाठी पुढाकार


फ्लमेंगो क्लबने ३८ वर्षांपूर्वी लिव्हरपूलच्या विजयानंतर अापल्या देशाचे राष्ट्रगान गायले हाेते. याचदरम्यान क्लबने लिव्हरपूलचा ३-० अशा फरकाने पराभव केला हाेता. या विजयानंतरच्या जल्लाेषातूनच हा राष्ट्रगीताचा साेहळा अायाेजित करण्यात अाला हाेता. अाता या तीन दशकांनंतर हीच संधी गमावली.   क्लबच्या विश्वचषकातील फायनलमध्ये अापल्या कट्टर प्रतिस्पर्धी लिव्हरपूलने अाता या क्लबचा  पराभव केला. लिव्हरपूलने १-० ने अाता अंतिम सामना जिंकला. यासह लिव्हरपूल क्लब किताबाचा मानकरी ठरला.


त्यामुळे अाता फ्लमेंगो क्लबनेने अापल्या राष्ट्रगीताच्या माध्यमातून भीषण अागीत मृत्युमुखी पडलेल्या १० खेळाडूंच्या स्मरणार्थ राष्ट्रगीत गायिले.   यादरम्यान  टीमवर दु:खाचा डाेंगर काेसळलेला हाेता. अापल्या युवा १० खेळाडंूंच्या अाठवणींनी विजेत्या संघातील सर्वच खेळाडूंच्या डाेळ्यात अश्रू दाटलेले हाेते. कारण याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात क्लबने अापले १० युवा खेळाडू गमावले हाेते. यादरम्यान रात्रीच्या वेळी खेळाडू राहत असलेल्या अकादमीला अचानक भीषण अाग लागली. याच अागीमध्ये १० खेळाडूंचा काेळसा झाला. दरम्यान, रात्रीच्या वेळी सर्वच झाेपेत असताना ही विदारक घटना घडली.


याशिवाय या ठिकाणी अागीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची कुठल्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळेच अाग अधिकच भडकली हाेती. यादरम्यान सीनियर खेळाडूंनी जिवाच्या अाकांताने मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे ठरले अाणि टीमला अापल्या १० खेळाडूंना काेळसा हाेताना पाहावे लागले. अाता याच घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या विराेधात प्रचंड संताप व्यक्त केला जात अाहे.

बातम्या आणखी आहेत...