आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Crime In 2018: आईच्या मृतदेहासोबत 3 दिवस झोपला 6 वर्षांचा चिमुरडा; बाहेर खेळला, पण कुणालाच सांगितले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली (चंदिगड) - सन 2018 आता सरत आहे. या वर्षात अनेक बऱ्या-वाईट घटना घडल्या. अशीच एक खळबळजनक घटना एप्रिल महिन्यात समोर आली होती. आईने गळफास घेतल्यानंतरही निरागस चिमुरडा तिच्या मृतदेहासोबत तब्बल 3 दिवस राहिला होता.

 

नेमकी काय होती ही घटना...

येथील फेज-7 च्या घर क्र. 537 मध्ये एका 35 वर्षीय महिलेने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. महिलेचा 6 वर्षांचा मुलगा पंख्याला लटकलेल्या आपल्या आईच्या मृतदेहासोबत 3 दिवस राहिला. त्याने याबाबत बाहेर कुणालाही सांगितले नाही. नंतर जेव्हा महिलेचा मृतदेह सडू लागल्याने दुर्गंधी सुटली, तेव्हा आसपासच्या लोकांना याची माहिती मिळाली. त्यांनी चंदिगडमध्येच राहणाऱ्या घरमालकाला याची माहिती दिली. सोबतच पोलिस कंट्रोल रूमलाही फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दार उघडले तेव्हा आत पंख्याला महिलेचा मृतदेह लटकलेला दिसला.

 

असे होते प्रकरण...
- मृतदेहाच्या एकदम जवळ सोफ्यावर महिलेचा 6 वर्षांचा मुलगा अरमान बसलेला होता. पोलिसांनी बालकाला तेथून उठवले आणि बाहेर नेले.
- मुलाने हळूच सांगितले की, "मम्मी म्हणाली होती की, मी फाशी घेत आहे, कुणाला सांगू नको. मी म्हणालो- मम्मी फाशी घेऊ नकोस तू मरून जाशील; पण मम्मीने ऐकले नाही आणि तिने फाशी घेतली."

- मृत महिलेचे नाव जसपिंदर कौर असे होते. पती रणजित सिंह आर्मीमध्ये असून त्यांची पोस्टिंग फरीदकोटमध्ये होती.

 

दुसऱ्या पप्पांना सांगितले होते- मम्मीने फाशी घेतली
- 6 वर्षीय अरमानने पोलिसांना सांगितले की, मम्मीने 3 दिवसांपूर्वी फाशी घेतली होती. त्याला पोलिसांनी विचारले की, तू याबाबत कुणाला सांगितले होते की नाही!
- यावर अरमान म्हणाला की, त्याने दुसऱ्या पप्पांना सांगितले होते की, मम्मीने फाशी घेतली आहे.
- पप्पा पहिल्या दिवशी म्हणाले की, पोलिसांना सांग. यानंतर मी दुसऱ्या दिवशी पप्पांना फोन करून सांगितले, तेव्हा ते म्हणाले की, मी काहीतरी करतो.
- जेव्हा तिसऱ्या दिवशी त्यांना फोन करून सांगितले तेव्हा पप्पा म्हणाले की, मी येत आहे, पण अजूनही आले नाहीत. पोलिसांनी तेव्हा अवैध संबंधांच्या अँगलनेही तपास केला.

 

भूक लागल्यावर दोन दिवस खाल्ले बिस्किट
- मुलगा म्हणाला की, जेव्हा पहिल्या दिवशी मम्मी फाशी घेतली तेव्हा त्याने काहीच खाल्ले नाही. रात्री जेव्हा भूक लागली तेव्हा घरात त्याला एक बिस्किटांचा बॉक्स मिळाला. ते खाऊन तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही हीच बिस्किटे खाल्ली.

 

खेळायला गेला, पण कुणाला सांगितले नाही
- आसपासचे लोक म्हणाले की, मागच्या दोन-तीन दिवसांपासून अरमान संध्याकाळी घराबाहेर यायचा आणि खूप वेळ पार्कमध्ये दुसऱ्या मुलांसोबत खेळायचा. अंधार होऊ लागल्यावर आपल्या घरी जायचा. पण त्याने कुणालाच काहीही सांगितले नाही.

 

मृतदेह सडू लागला होता
- पंख्याला लटकलेल्या जसपिंदरच्या मृतदेहाची अवस्था एवढी वाईट होती की, ती पाहून सगळ्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. मृतदेह पाठीमागून सडू लागला होता.
- मृतदेहाचा चेहरा तसेच हात-पाय सडून फुटले होते. चेहरा व हातापायांतून रक्त वाहून खाली फरशीवर सांडले होते.
- धक्कादायक बाब म्हणजे, एवढी दुर्गंधी येत असूनही अरमान आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होता.

 

मामाचा फोन आल्यावर त्यांना सांगितले की, आईने फाशी घेतली
- शुक्रवारी जसपिंदरची मैत्रीण जी फेज-3 बी 2 मध्ये राहते, तिला पोलिसांनी कॉल करून बोलावले. यानंतर आत्महत्येची माहिती तिच्या भावाला देण्यात आली.
- मृत जसपिंदरचा भाऊ पोलिसांच्या फोनवर कॉल करून भाचा अरमानशी बोलला. तेव्हा अरमानने सांगितले की, मम्मीने फाशी घेतली आणि मम्मी वारली आहे.
- पोलिस एसएचओ राजीव कुमार म्हणाले की, आम्ही फोनवरून माहिती मिळाल्यावर आम्ही घटनास्थळी गेलो. मृतदेह ताब्यात घेऊन हॉस्पिटलच्या मॉर्चरीमध्ये पोस्टमॉर्टममध्ये ठेवण्यात आला. तेथे कोणतीही सुसाइड नोट मिळाली नव्हती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...  

 

बातम्या आणखी आहेत...