आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Flashback : If Father Salim Khan Did Not Stop Him, Today 'Mannat' Is Salman's Only

फ्लॅशबॅक : पिता सलीम खान यांनी टोकले नसते तर आज 'मन्नत' चा मालक शाहरुख नाही, सलमान असता 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचे म्हणणे आहे की, आज ज्या सी-फेसिंग बंगल्याचा मालक शाहरुख खान आहे, तो कधीकाळी सलमानला खरेदी करायचा होता. तो एका वेबसाइटवर 5 जूनला रिलीज होत असलेल्या फिल्म 'भारत'चे प्रमोशन करत होता. याचदरम्यान तो म्हणाला की, पिता सलीम खान यांनी जर विचारले नसते की, एवढ्या मोठ्या घरात काय करशील ? तर आज तो 'मन्नत'चा मालक असता. सलमानने सांगितले, त्यांनी पित्याचा सल्ला मान्य केला आणि नंतर शाहरुख खानने तो बंगला खरेदी केला.  

 

शाहरुखला एक प्रश्न विचारू इच्छितो सलमान... 
53 वर्षांच्या सलमानने पुढे सांगितले, "मी शाहरुखला विचारू इच्छितो की, तू एवढ्या मोठ्या घरात काय करतोस ?" काही दिवसांपूर्वी शाहरुखने एका रेडियो शोवर 'मन्नत' खरेदी करण्यामागची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, "मी दिल्लीचा आहे आणि दिल्लीवाल्यांना कोठी (बंगला) मध्ये राहण्याची सवय असते. मुंबईमध्ये लोक अपार्टमेंट्समध्ये राहतात. पण दिल्लीमध्ये जर कुणी आर्थिकरित्या कमकुवत आहे. तरीही तो छोट्या मोठ्या बंगल्याचा मालक असतो."

 

गौरीची आई म्हणायची - तुम्ही खूप छोट्या घरात राहता...  
शाहरुखने रेडियो शोमध्ये सांगितले होते, "जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा विवाहित होतो आणि पत्नी गौरीसोबत एका छोट्याश्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो. माझ्या सासूबाई म्हणायच्या - 'तुम्ही खूप छोट्या घरात राहता.' जेव्हा मी 'मन्नत' पहिले तेव्हा माझ्या दिल्लीतील कोठी सारखेच वाटले. त्यामुळे मी हे खरेदी केले. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेन्ट आहे."